Home गडचिरोली महावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर।

महावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर।

82
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0032.jpg

महावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): शिवणीवरुन हिरापुर पोटेगाव मार्ग जातो.शिरापुर नंतर गुरवळ्याकडे जातांना एक किलोमिटर अंतरावर सुरजपुर असा रिठ आहे.तिथे प्रत्यक्ष वस्ती नसुन शेती आहेत व त्या शेती शिवणी ग्रामपंचायत अंडरमध्ये येतात.तेथे महावितरण ने शेतकऱ्यांना विज पुरवठा केलेला आहे.शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवाणगी न घेता शेतीची नासधुस करुन वाटेला त्या ठिकाणी पोल टाकुन शेतीची नासधुस केली.व काही शेतकऱ्यांना विज पुरवठा करण्यात आहे.जे शेतकरी कनेक्शन घेतले ते कदाचीत विजबिल भरले नसतील.त्यांना धडा शिकविण्यासाठी महावितरणने लाखो रुपये खर्च करून केलेला वीजपुरवठा तारे कापुन बंद केला.कदाचित विज बिल न भरणार्याचेच कनेक्शन कापता आले असते.
पंरतु तसे न करता त्यांनी पुर्ण तार कापली व एवढ्यापुरतच चुप न राहता उभे असलेले सिंमेन्ट चे पोल खाली पाडले होते.व ते ही शेतकऱ्यांच्या शेतात आता हंगामाचे दिवस सुरु होत आहेत.व महावितरणशी काहीही संबंध नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जोरजबरीने परवाणगी न घेता उभे केलेले पोल शेतकऱ्यांच्या शेतात अस्ताव्यस्त पडलेले पोल महावितरणने त्वरीत उचलावे.अन्यथा पीक नुकसान म्हणुन महावितरणेने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर यांनी निवेदनातुन केली.

Previous articleमहागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन।
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here