Home पुणे वरवंड येथील गुन्ह्यातील सव्वा वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद: यवत व...

वरवंड येथील गुन्ह्यातील सव्वा वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद: यवत व दौंड गुन्हे शोध पथकाची दौंड येथे कारवाई :

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0037.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे वरवंड येथील गुन्ह्यातील सव्वा वर्षांपासून फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद:
यवत व दौंड गुन्हे शोध पथकाची दौंड येथे कारवाई :
दिनांक १६/०१/२०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव वय ३५ रा. वरवंड ता.दौंड जि. पुणे यास यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
दि.११/११/२०२१ रोजी रात्रौ ०२:०० वा चे सुमारास यातील फिर्यादी यांचे ओळखीचा इसमनामे चंदर उर्फ चंद्रकांत शिवाजी जाधव रा. शिवाजी नगर, वरवंड ता.दौंड जि.पुणे याने फिर्यादीचे घराचे खिडकीचा कोयंडा कशाचे तरी साहाय्याने काढून खिडकीतुन आत हात घालुन फिर्यादी ची पर्स उचका पाचकी करत असताना फिर्यादीने त्यास तु आमचे खिडकीत काय करतोस असे विचारले असता त्याने तुच मला पाहिजे आहे मला एकदा तुला करायचे आहे असे म्हणुन फिर्यादीचे मनास लज्जा वाटेल अशा भाषेत बोलुन फिर्यादीचे पर्समधील ४ ग्रॅम वजनाचे मणिमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १३,५००/- रू किं चा मुद्देमाल फिर्यादीचे घराचे खिडकीचा कोयंडा कशाचे तरी साहाय्याने काढुन आत हात घालुन चोरून नेला आहे. वगैरे मजकुरचे तक्रारी वरून यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.९८९/२०२१ भा. द.वि. क.३५४,३२७,४५२,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून आरोपी
चंदऱ् उर्फ चंद्रकांत जाधव हा फरार झाला होता तो दौंड रेल्वे स्टेशन ला येणार असलेची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाले नंतर यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपी नामे चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव वय ३५ वर्षे रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे यास सापळा रचून ताब्यात घेतले असून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचे वर खालीलप्रमाणे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.
१) यवत पो.स्टे. गु.र.नं.१३०/२०१६ भादंवि क ३०२
२)) यवत पो.स्टे. गु.र.नं.७५९/२०२१ भादंवि क ४५७,३८०
३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ६४८/२०१५ भादंवि क.४५४,४५७,३८०
४) दौंड गु.र.नं.२७/२०१९ भा. द.वि.क.३९४
सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यवत, दौंड, हडपसर या पोलीस ठाण्यात खुन, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी प्रकारचे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.आनंद भोईटे बारामती विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील*
पोहवा. निलेश कदम,
पो.हवा. गुरू गायकवाड,
पो. हवा. अक्षय यादव
पो. हवा. सुभाष राऊत
यांनी केलेली असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप कदम,गणेश मुटेकर हे करीत आहेत.

Previous articleसावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनाला कलाटणी देऊ शकते …… मा.बाबुराव माळी
Next articleनाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनालाअचानकआग..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here