Home नाशिक नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनालाअचानकआग..!

नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनालाअचानकआग..!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0046.jpg

नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनालाअचानकआग..!

भास्कर देवरे(युवा मराठा न्युज नेटवर्क)

नाशिक : आज नाशिक मध्ये वाहनांना आग लागल्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे देखील पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केलेल्या गाड्यांना आग लागल्याची घटना समोर येत आहे. या घटनेत २ ते ३ वाहनं जळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरुवातीला आग आटोक्यात येत नव्हती मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस स्टेशन (Mumbai Naka Police Station ) येथील गुन्ह्यातील जमा केलेल्या वाहनांना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अचानक आग लागली होती. आग लागल्यामुळे लिसांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला शताब्दी हॉस्पिटलच्या आग विझवण्याच्या उपकरणांनी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो प्रयत्न असफल ठरला. आग कमी होण्याऐवजी वाढतच होती.सुरुवातीला शताब्दी हॉस्पिटलच्या आग विझवण्याच्या उपकरणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग अधिक भडका घेत होती. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या अग्निशमन बबांना पाचरण करण्यात आले. महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी सुरुवात केली मात्र गाड्यांमध्ये डिझेल पेट्रोल मुळे आगीचा भडका
वाढतच चालला होता.एकीकडे आग विझविण्याचे प्रयत्न चालू असताना दुसरीकडे मात्र हे दृश्य बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. काही वेळेच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. शेजारीच मुंबई नाका पोलीस स्टेशन होते त्यामुळे आग विझवण्यात आली नसती काही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आग पूर्णपणे विझल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. या आगीत दोन चार चाकी जळून खाक झाली आहेत अशी माहिती आहे.नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केलेल्या गाड्यांना आग लागल्याची ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. अग्निशामक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान परिसरात अज्ञाताने जळती विडी फेकल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल अद्याप पुष्टी झालेली नाही.
आग विझाविण्यासाठी नागरिकांनी देखील धाव घेत तात्काळ मदतकार्यात पोलिसांना हातभार लावला. या घटनेत वेळीच सतर्कता दाखविल्याने मोठी हानी टळली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या बाजूला अनेक रुग्णालये आहेत. त्यामुळे आग पसरली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here