• Home
  • नियमबाह्य ऑक्सिजन सिलिंडरसाठी दबाव; महापालिकेचाच फतवा : सिलिंडर घरी द्या

नियमबाह्य ऑक्सिजन सिलिंडरसाठी दबाव; महापालिकेचाच फतवा : सिलिंडर घरी द्या

*मालेगाव : नियमबाह्य ऑक्सिजन सिलिंडरसाठी दबाव; महापालिकेचाच फतवा : सिलिंडर घरी द्या* *मालेगांव,(श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज)-*
कोरोना हॉटस्पॉट मालेगावात रुग्णांना रुग्णालयात दाखल न करता घरीच ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कोविड सेंटर्समधून ८० सिलिंडर्स गायब झाले असून सुमारे १५० ते २०० सिलिंडर्स अत्यवस्थ रुग्णांना घरीच लावल्याचे कळते. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेने असे ऑक्सिजन सिलिंडर्स नाकारू नयेत अशी नोटीसच वितरकांना काढली आहे.

मालेगावात प्रशासनाने नेमलेले ‘जीवन’ हे कोविड हॉस्पिटल बंद पडल्यावर संशयित व अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलशिवाय परस्पर घरी ऑक्सिजन सिलिंडर देण्यास कायद्याने मनाई आहे. रुग्णांवर देखरेखीबाबत डॉक्टरांची लेखी शिफारस असेल तरच घरी सिलिंडर देण्याची मुभा असते. मात्र, घरी लपलेले रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचणे, विलग करून कोविड सेंटर्समध्ये उपचार होणे, कुटुंबीयांना क्वाॅरंटाइन करणे, त्यांच्या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. मात्र वेगळाच प्रकार सुरू आहे.

*कोविड सेंटरमधून ८० सिलिंडर्स गायब*

इंदूर गॅस एजन्सी ही ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणारी मालेगावातील एकमेव एजन्सी आहे. त्यांनी ९ एप्रिलपासून शहरातील रुग्णालये व कोविड सेंटर्सना १ हजार सिलिंडर्स वितरित केले आहेत. त्यापैकी ८५६ सिलिंडर्स त्यांच्याकडे परत आले आहेत. १०० सिलिंडर्स रुग्णालयात व सेंटर्समध्ये आहेत. मात्र ८० सिलिंडर्स परत आलेले नाहीत. जीवन हॉस्पिटलमधून गायब झालेले हे सिलिंडर्स वस्तीत घरगुती उपचारांसाठी फिरवले जात असल्याचा धोका व्यक्त होत आहे.

*आमच्यावर दबाव आणला जातोय*

राजकीय दबावामुळे पालिकेने पत्र दिल्याने घरी सिलिंडर देण्यात आले. ४५ रुग्णांच्या घरी सिलिंडर्स गेले आहेत. एका मृत रुग्णाचे सिलिंडर परस्पर दुसऱ्या रुग्णास लावण्याचे प्रकारही सुरू आहेत. पालिकेला कळवले, मात्र माझ्यावरच दबाव वाढतो. दररोज २०-२५ लोक रिक्षा घेऊन सिलिंडर्स नेण्यासाठी येत आहेत. –

anews Banner

Leave A Comment