• Home
  • 🛑 तिजोरीत खडखडाट असताना…! मंत्र्यांसाठी वाहन खरेदी….🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 तिजोरीत खडखडाट असताना…! मंत्र्यांसाठी वाहन खरेदी….🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 तिजोरीत खडखडाट असताना…! मंत्र्यांसाठी वाहन खरेदी….🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विशेष बातमी ⭕कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने 5 वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा क्रिस्टा ही 22 लाख 83 हजार रु. किमतीची कार खरेदी करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने सध्या आरोग्य विभाग व इतर महत्त्वाचा अपवाद वगळता खर्च करण्यास मनाई केली आहे. सरकारचा महसूल घटल्याने कर्मचार्‍यांचा पगार कपात केला असतांना शालेय शिक्षण, क्रीडा राज्यमंत्री, अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,कार्यालयीन वापराकरिता एक अशी 5 वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
सद्यस्थितीत शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांना कार्यालयीन वापराकरिता शासकीय वाहन आवश्यक असल्याने विशेष बाब म्हणून वाहन खरेदी करण्यास वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने तसेच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment