• Home
  • 🛑 प्रशासनाची दारुविक्रीला परवानगी…! मग खेळाडूंच्या प्रॅक्‍टिसला का नाही.. 🛑 ✍️नागपूर :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 प्रशासनाची दारुविक्रीला परवानगी…! मग खेळाडूंच्या प्रॅक्‍टिसला का नाही.. 🛑 ✍️नागपूर :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 प्रशासनाची दारुविक्रीला परवानगी…! मग खेळाडूंच्या प्रॅक्‍टिसला का नाही.. 🛑
✍️नागपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ शरिरासाठी घातक असूनही केवळ महसुलाच्या मोहापायी प्रशासनाने दारूविक्रीला परवानगी दिली. मात्र त्याच शरिरासाठी “टॉनिक’चे काम करणाऱ्या खेळाडूंच्या सराव व व्यायामाला अद्‌याप हिरवी झेंडी मिळाली नाही. लॉकडाउनमुळे जवळपास साडेतीन महिन्यांपासून उपराजधानीतील क्रीडा जगत पूर्णपणे ठप्प पडले असून, प्रॅक्‍टिसची संधी मिळत नसल्याबद्‌दल खेळाडूंमध्ये नाराजी व खदखद आहे. दारूला परवानगी दिली, मग खेळांना का नाही ? असा संतप्त सवाल शहरातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटकांनी प्रशासनाला विचारला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर 22 मार्चला लॉकडाउन लागला होता. 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.
लॉकडाउनमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून शहरातील आऊटडोअर व अनडोअर “स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज’ पूर्णपणे बंद आहेत. बहूतांश खेळाडू आपापल्या घरांमध्ये कोंडून असल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होत आहे. नैराश्‍य व चिडचिड वाढत चालली आहे. प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवेत येत नसूनही दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र खेळ आणि खेळाडूंकडे लक्ष द्‌यायला त्यांना वेळ नाही. दारू विकत घेण्यासाठी अनेक लोक रांगेत एकमेकांना चिकटून उभे राहतात. दुकानांसमोर “सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णपणे फज्जा उडविला जातो. प्रशासनाकडून खेळाडू व संघटकांनाही अटींवर सरावाची परवानगी हवी आहे. “सोशल डिस्टन्सिंग’सह मास्क व सॅनिटायझर वापरण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्याबरोबरच क्रीडा स्पर्धांचीही लगबग आरंभ होणार आहे. पुरेशा सरावाअभावी खेळाडूंना स्पर्धेत उतरणे कठिण जाणार आहे. त्यामुळे सरावासाठी मैदाने खुली करून द्‌यावी, अशी मागणी कराटे प्रशिक्षक विपीन हाडके व अजय मोंढे यांनी प्रशासनाकडे केली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment