Home पालघर जव्हारचे भुमि अभिलेख कार्यालय रिक्त पदांमुळे पडले ओस. महाराष्ट्र शासनाचा सावळा गोंधळ.

जव्हारचे भुमि अभिलेख कार्यालय रिक्त पदांमुळे पडले ओस. महाराष्ट्र शासनाचा सावळा गोंधळ.

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0057.jpg

जव्हारचे भुमि अभिलेख कार्यालय रिक्त पदांमुळे पडले ओस.

महाराष्ट्र शासनाचा सावळा गोंधळ.                    जव्हार,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

जव्हार तालुक्यात जमिन धारकांसाठी,जमिन मालकांना जमिनीची विविध कागदपञे त्यात नकाशे,उतारे,जमिनीची आखणी, मोजणी हि सर्व कामे करण्यासाठी शहरात महाराष्ट्र शासनाचे उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय आहे.परंतु महाराष्ट्र शासनाच्या सावळ्या गोंधळामुळे हे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या पद भरतीमुळे ओस पडले आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांना जमिनीच्या कागद पञांच्या मिळकतीसाठी हाल सोसावे लागत असुन हेलपाटे मारावे लागत आहेत तर अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे सेवेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार सोपवल्याने ससेहोलपट होत असुन कामे करताना दमछाक होत आहे.
जव्हार भुमि अभिलेख कार्यालयात शासन दरबारी कागदोपञी १४ पदे मंजूर दाखवली असताना कार्यालयात फक्त केवळ ३ पदे कार्यरत असल्याचा धक्कादायक सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ५० टक्के ही पद भरती केली नसल्याचा महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अजून ११ रिक्त पदे भरायची बाकी आहेत.त्यामुळे कार्यालयातील खुर्च्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओस पडल्या आहेत. रिक्त पदांमध्ये,गट ब(वर्ग २) चे रिक्त पद- १, गट क(वर्ग ३) चे रिक्त पदे- ७ , गट ड(वर्ग ४) चे दप्तर बंद पद- १, गट ड(वर्ग ४) शिपाईचे पदे- २ अशी एकूण १७ रिक्त पदे भरावयाची बाकी आहेत. शासनाकडुन हि पदे का भरली गेली नाहीत.हे अजुन गुलदस्यात आहे.
सद्या जव्हारच्या भुमि अभिलेख कार्यालयात भरलेली ३ पदे असुन उपस्थित कर्मचारी ३ आहेत.त्यात शिपाई, मुख्य अधिकारी सहाय्यक, दप्तर बंद अधिकारी यांचा समावेश आहे. येथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर कर्मचारी पदसंख्या भरतीसाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. अपुऱ्या पद संख्येमुळे कार्यालयातील शिपाई वर्गाला हि जमिनीचे नकाशे,उतारे बनविण्याची वेळ ओढवली असुन कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्य बळामुळे शहरी व ग्रामीण नागरिकांची जमिनीची कामे लांबणीवर पडत आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागत आहेत.त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here