• Home
  • राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजू शेट्टी आमदार होणार ; शरद पवारांनी दिली ऑफर

राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजू शेट्टी आमदार होणार ; शरद पवारांनी दिली ऑफर

🛑 राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजू शेट्टी आमदार होणार ; शरद पवारांनी दिली ऑफर 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनविधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असे राजू शेट्टी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे .
लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर भाजपमधून काढता पाय घेतला . त्यानंतर शेट्टी यांनी शेतकरी मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
मागील लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अपयश आले. लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, अशी इच्छा महा विकास आघाडीकडीने व्यक्त केली होती .
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ तालुक्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत शेट्टी म्हणाले, गेली काही दिवस आईची प्रकृती खराब होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जयंत पाटील घरी आले होते. याच वेळी काही राजकीय चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून एक जागा देण्यात येण्याची चर्चा आहे .⭕

anews Banner

Leave A Comment