• Home
  • युवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन

युवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन

*युवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन*
मालेगाव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)- युवा मराठा न्युज चँनलचे कँमेरामन व मालेगाव कँम्पातील सप्तशृंगी फोटो स्टुडीओचे संचालक सुनिल गबा मिस्तरी (रुले)यांचे आज वयाच्या ४२व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मिस्तरी परिवार मुळ जळगाव जिल्ह्यातील असुन गेल्या अनेक वर्षापासून ते मालेगाव शहरात व्यवसायानिमित स्थानिक झालेले होते.सुनिल मिस्तरी हे युवा मराठा न्युज चँनलचे धडाडीचे व उत्साही कँमेरामन म्हणून कार्यरत होते.त्यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनामुळे मिस्तरी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज परिवार सहभागी आहे.मयत मिस्तरी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ भावजयी बहिणी असा परिवार आहे,ईश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच ईशचरणी आदरांजली व युवा मराठा परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली.

anews Banner

Leave A Comment