Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न..!!

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न..!!

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0052.jpg

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न..!!

कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथे अमृत महोत्सव दिनानिमीत्य ध्वजारोहण..!!

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या या मोहिमेत गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले होते.
अमृत महोत्सव दिनानिमीत्य माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथे आज १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी चे रवींद्रबाबा आत्राम, कर्मचारी महेश गुप्ता सचिव, हेमंत देशमुख सह सचिव, शामराव बोंमनवार लेखापाल, लक्ष्मण रेड्डी चिरलावार निरीक्षक, महेश गददेवार आपरेटर, मयूर गुम्मूलवर लिपीक, तिरुपती अय्याला, लिलादर गोदारी, अंकीत कोरेत, नागेश आत्राम, राजू तालांडे, पेंदाम काका,जीवन तलांडे उपस्थित होते.

Previous articleभाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन कार्यक्रम
Next articleयेत्या २६ जानेवारीला कैंसर हॉस्पिटलचे उदघाटन करणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here