Home नांदेड देगलूर येथे पत्रकार भवनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय भारत संघटनेच्या वतीने निवेदन..

देगलूर येथे पत्रकार भवनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय भारत संघटनेच्या वतीने निवेदन..

117
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0047.jpg

देगलूर येथे पत्रकार भवनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय भारत संघटनेच्या वतीने निवेदन..

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

लोकशाहीचा चौथा व मजबूत आधारस्तंभ म्हणजे पत्रकार. मात्र नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात पत्रकाराची मोठी गैरसोय होत होती. निर्भीडपणे समाजातील विविध समस्या आपल्या लेखणी तथा चैनलच्या माध्यमातून समाजासमोर मांडणाऱ्या या पत्रकाराला विसाव्यासाठी व समाज उपयोगी बातम्या लिखाणासाठी, जागा उपलब्ध नसणे म्हणजे पत्रकारावर एक प्रकारचा अन्यायच आहे. याच अनुषंगाने राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने देगलूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत देगलूर येथे पत्रकार भवनाची निर्मिती करण्यासंबंधी विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. शिवाय पत्रकारांची होणारी गैरसोय याबाबत ही चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मुख्य अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. असे सांगितले. यापूर्वी वरिष्ठ पत्रकारांनी देगलूर येथे पत्रकार भवनाची निर्मिती करावी यासाठी अनेक प्रयत्न केले. देगलूर येथे नव्याने स्थापन राष्ट्रीय पत्रकार संघ भारत या संघटनेने आज निवेदनाद्वारे पत्रकार भवनांची निर्मिती करण्यासंदर्भात मागणी केली. व तसेच नगरपरिषद देगलूर येथील सभागृहात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे छायाचित्र लावण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली. सतत पाठपुरावा करून जोपर्यंत पत्रकार भवन मिळणार नाही व पत्रकारांची गैरसोय टाळली जाणार नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणार अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजय हळदे, जिल्हा सचिव इर्शाद पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रभारी शशिकांत पटणे, तालुकाध्यक्ष योगेश जाकरे, तालुका उपाध्यक्ष शहाजी वरखिंडे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर, संयोजक सुभाष वाघमारे आदींच्या सह्या आहेत.

Previous articleदहिवड येथील एका शेतकरी कुटुंबातील भूषण सोनवणे ची इंडियन नेव्ही s.s.r या पोस्टसाठी निवड
Next articleरखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here