Home गडचिरोली मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा डॉ. सौ. चंदा कोडवते

मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा डॉ. सौ. चंदा कोडवते

149

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0074.jpg

मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा

डॉ. सौ. चंदा कोडवते                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

श्री गुरुदेव योग शिक्षण व समिती गडचिरोली व संत नगाजी महाराज मंदिर शाहू नगर व खुशरंग शेंडे परिवारातर्फे संत नगाजी महाराज मंदिर येथे “गोकुळ अष्टमी” निमित्त आयोजित “सामुदायिक प्रार्थना” प्रसंगी डॉ. चंदाताई कोडवते यांनी विचार मांडले. मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.आई वडिलांची सेवा केल्याने जीवन सार्थक होते. समाजातील अंधश्रद्धारुपि अज्ञान,अंधकार दूर करण्यासाठी गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर महतांनी मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, देव देवळात नाही, तर माणसात आहे,हे सांगितल आहे.त्यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. स्वामी विवेकानंदांनी देखील दीनदुबळ्या समाजाचा उद्धार हे ध्येय समोर ठेवून कार्य केले.
याप्रसंगी मारोतराव ईचोडकर माजी सभापती प. स. गड., सुनिल चडगुलवार से. नि. नायब तहसीलदार, सुखदेव वेठे, नामदेव ईजनकर, नामदेव शेंडे, दिलीप मेश्राम, बाबाराव नक्षिने, मनोज सिंह पवार, ज्ञानेश्वर बांबल, दिगंबर रामटेके, प्रभाकर लांडगे, नगराळे, दिनकर नक्षिने, काशिनाथ दहेलकर, महागु तुराटे, मधुकर विधाते, विजय गिरसावळे, जनार्दन पाल, मनोहर कुदरपवार, रेखा वाटेकर, शालु शेंडे, कल्पना ईजनकर, प्रिती मुक्तावरम, मिरा ताजने, प्रसाद म्हशाखेत्रि, अंजली गायकवाड.अरुण बोडखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आयोजन प्रविण मुक्तावरम जिल्हा प्रचारक, आभार प्रदर्शन खुशरंग शेंडे यांनी केले.

Previous articleथोर महापुरुषांचे विचार पुढील पिढीला रुजावे – डॉ. सतिश भाऊ वारजुकर
Next articleतीन वेळा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना किमान २ वेळेची नुकसान भरपाई द्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.