Home बुलढाणा रखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा

रखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा

132
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0058.jpg

रखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपुर तालुक्यामध्ये संग्रामपुर, सोनाळा, बावणबीर महसूल मंडळामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झालेली होती. अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याचे शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येवुन शासनास अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार शासन स्थरावरून नुकसान बाधीत शेतक-यांना ऑनलाईन पध्दतीने अनुदान वाटपाची प्रक्रीया सुरु झालेली असून ब-याच शेतक-यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे.परंतु अदयापही या तीन मंडळामध्ये जवळपास 4150 बाधीत शेतक-यांनी आपले आधार कार्ड, बैंक पासबुक इत्यादीची झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर पंचनामे करणा-या किंवा यादया तयार करणा-या तलाठी/ ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या कडे दिले नसल्याने ते अनुदाना पासून वंचीत आहेत. पंचनामा करणारे सर्व संबंधीत कर्मचारी यांनी वारंवार पाठपुराव करुन सुध्दा 4150 बाधीत शेतक-यांनी अनुदान मिळण्यासाठी आवश्यक असलेली माहीती पुरविलेली नाही.तरी संबंधित शेतकऱ्यांना संग्रामपूर तहसीलदार श्री योगेश्वर टोम्पे यांच्या वतीने जाहीर आव्हाण करण्यात येते की, संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बैंक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नं.
इत्यादी ज्या कर्मचा-यांनी आपल्या गावाच्या यादया तयार केल्या आहेत त्यांच्याकडे दिनांक 21/6/2023
या कालावधीपर्यंत देण्यात यावे. विहीत मुदतीत आपली माहीती संबंधीत कर्मचा-याकडे न आल्यास त्या नंतर आपण अनुदानापासून वंचीत राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, तसेच अनुदान वाटप हे ऑनलाईन पध्दतीने होत असल्याने प्रतेक खातेदाराने आपले आधार कार्ड आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अपडेट करून घ्यावे. व अधार कार्ड, मोबाईल नं. आपल्या बँक खात्याशी संलग्न करून ध्यावेत. त्याशिवाय अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा होणार नाही.

Previous articleदेगलूर येथे पत्रकार भवनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय भारत संघटनेच्या वतीने निवेदन..
Next articleशेतमजूरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन कराः राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी.!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here