Home बुलढाणा शेतमजूरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन कराः राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी.!

शेतमजूरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन कराः राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी.!

138
0

आशाताई बच्छाव

IMG-20230616-WA0049.jpg

शेतमजूरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन कराः राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी.!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे
विशेष प्रतिनिधी संग्रामपूर
राज्यात सर्वात शेतीत कष्टकरी वर्ग हा शेतमजूर आहे. त्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी मुंबई येथिल सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. यावेळी बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी गेल्या दोन वर्षांपासून शेतमजुरांच्या हितासाठी फार मोठा लढा उभा केला आहे. त्याकडे सरकार मात्र गांभीर्याने पाहत नाही हे दुर्दैव आहे. वास्तविक राज्यात महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत राज्यातील कामगारांना अपघात विमा योजना, स्वतंत्र घरकुल योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान सवलत, आरोग्य विभागाकडुन कामगार कुटुंबीयांना १००% मुक्त सेवा, अशा प्रकारच्या सर्वच सवलती देण्यात येतात. पंरतु शेतात काम करणारा राज्यातील शेतमजूर आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने बेदखल होऊन मजुर आत्महत्येकडे ओढवतो आहे. शेतात काम करतांना अपघात झाला तर शासन स्तरावरुन त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे राज्यातील शेतात काम करणारा शेतमजूर सुरक्षीत नाही. करीता राज्यामधे स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून कामगार मंडळअंतर्गत शेतमजुरांना सर्व सवलती लागु कराव्यात व शेतमजुरांना दरमहा मानधन लागु करण्यात यावे. असे यावेळी राजु शेट्टी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सोबत बैठकीत बोलताना सांगितले. यावर उत्तर देतांना राज्यात शेतमजुरांची संख्या फार आहे. त्यांची गणती करुन त्याची पाहणी केली जईल. त्याला मोठया निधीची तरतूद करण्या संदर्भात विचार केल्या जाईल. राज्यात शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून राज्यातील शेतमजुरांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अशी ग्वाही दिली. यावेळी शेतमजूर चळवळीचे नेते प्रशांत डिक्कर,सावकर मादनाईक, प्रा.डॉ.जालंधर पाटील,संदीप जगताप,महेश खराडे,संदीप राजोबा, धनंजय कोरडे वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

Previous articleरखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा
Next articleकिनवट जवळील आदिवासी सावरगावने अनुभवली शासन आपल्या दारीची प्रचिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here