Home उतर महाराष्ट्र आशापूरी माता मंदीराच्या विकासाठी भरीव मदतीचे आमदार बोरसेंचे आश्वासन

आशापूरी माता मंदीराच्या विकासाठी भरीव मदतीचे आमदार बोरसेंचे आश्वासन

82
0

राजेंद्र पाटील राऊत

(जगदिश बधान सटाणा प्रतिनिधी यांचेकडून)-             बागलाण तालुक्यातील नरकोळ येथील श्री आशापुरी माता मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात भरीव मदत करणार असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.
नरकोळ येथील श्री आशापुरी माता मंदिराच्या १३ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी आमदार बोरसे बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, शिवकालीन मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी मागील बाजूस इतिहासाची साक्ष देणारी आशापुरी माता देवस्थान परिसरात असलेली मंदिरे अस्तित्वात आहेत हा इतिहास मंदिरांचे अस्तित्व टिकवून ठेवत जोपासावा लागणार असून,हा परिसर तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून विकसित करूच पण या देवस्थानाला लाभलेले भौगोलिक स्वरूप लक्षात घेऊन हे स्थळ पर्यटनासाठी सुद्धा विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. मंदिराच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळपासून पंचांगकर्म, देवतापुजन,महापुजा,देवीला महाअभिषेक होमहवन, संपूर्ण बलिदान, पूर्णाहुती, महाआरती, जाप, देविपाठ,५६ भोग प्रसाद, महाप्रसाद आदि कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी महापुजा काशिनाथ धामणे, पंडीत कोठावदे, राजेंद्र कोठावदे, यांच्या हस्ते तर होमपुजेचे मानकरी प्रकाश कोठावदे,विलास कोठावदे,सचिन धामणे, चंद्रकांत धामणे, राजेंद्र कोठावदे यांनी सपत्नी केली. महाअभिषेकसाठी पुरोहित म्हणून रुपेश गर्गे(नाशिक)व गणेश गर्गे ( मुल्हेर)हे मंञघोष यांनी केला.
यावेळी अंतापुर येथील शंकर महाराज मठाचे गुलाब महाराज, कळवण नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका भाग्यश्री रुपेश शिरोडे,सटाणा येथील समकोच्या माजी चेअरमन सौ.रुपाली परेश कोठावदे,पंचायत समिती सदस्य संजय जोपळे,रामदास सुर्यवंशी, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र महाजन, शाखा अभियंता विनोद पाटकर,ज्येष्ठ नेते श्रीधर तात्या कोठावदे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, भडाणेचे माजी सरपंच नानासाहेब भामरे,ताहाराबादच्या सरपंच शीतल नंदन,उपसरपंच जीवन माळी,तूंगन दिगरचे उपसरपंच राजू गावित,देवठाण दिगरचे सरपंच चूनीलाल ठाकरे आदी मान्यवरांचा भालचंद्र कोठावदे,देविदास कोठावदे,महा.वाणी युवा मंच बागलाण चे माजी अध्यक्ष श्री.सचिन कोठावदे,ताहराबाद ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रीती सचिन कोठावदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातून भक्त परिवार उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशापुरी भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले.

Previous articleअनाथ बालकांना बाल संगोपन व बाल न्याय निधीमधून लाभ
Next articleकुत्र्यांनी उगवला सूड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here