Home कोल्हापूर कुत्र्यांनी उगवला सूड

कुत्र्यांनी उगवला सूड

1151
0

राजेंद्र पाटील राऊत

कुत्र्यांनी उगवला सूड

पेठवडगाव राहुल शिंदे :पेठवडगावमधील प्रभाग क्रमांक एक बेपारी वसाहतमध्ये मास मटण असणारा कत्तलखाना काही कारणास्तव बंद करण्यात आला आहे.गेली दोन महिने कत्तलखाना बंद असल्याने तेथील भटक्या कुत्र्यांचा कत्तलखान्यातून बाहेर फेकला जाणारा मार्ग बंद झाला त्यामुळे भुकेने पिसाळलेली आहेत कुत्र्यांची संख्या साठ ते सत्तर पेक्षा अधिक आहे तेथील लोकांनी कुत्र्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर कुत्र्यांनी लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील कितीतरी घरगुती कुत्रे तसेच पाळीव प्राण्यांना ठार केले .
नगर पालिका आयुक्त अधिकारी व पोलिस अधिकारी व प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे यापुढे पालकांच्या मुलांवरही हल्ला होऊ शकतो ही घटना खूप भयंकर आहे प्राणी भुकेच्या भावनेने पेटून उठतात तसेच नागरिकांच्या हानी होऊ नये यासाठी पालिकेने काहीतरी ठोस पर्याय केला पाहिजे .अशी मागणी काही जाणकार नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here