Home कोकण छावा प्रतिष्ठान चे विद्यमान संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांचा ३५ वा...

छावा प्रतिष्ठान चे विद्यमान संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नारशिंगे पेन, वही वाटपाचा कार्यक्रम संपन्न…

221

राजेंद्र पाटील राऊत

छावा प्रतिष्ठान चे विद्यमान संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नारशिंगे पेन, वही वाटपाचा कार्यक्रम संपन्न…

दि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनिल धावडे यांच्या हस्ते त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर जि.प.शाळा नारशिंगे येथे मुलांच्या समवेत केक कापून शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन वाटप करण्यात आले.

छावा प्रतिष्ठान चे सचिव समीर गोताड यांनी शाळेतील कार्यक्रमाची सुरुवात करुन माहिती देत असताना असे म्हटले की, सुनिल धावडेसाहेब हे सध्याच्या समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांना सर्व क्षेत्रातील उत्तम जाण आहे हे आपणा सर्वांना अवगत आहे अशा कार्यक्रमामुळे सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते आणि म्हणूनच आपल्या मराठी शाळेमधील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होवून प्रगल्भ आणि सक्षम समाज घडवण्यास मोठी मदत होते.

तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य आम्हांला लाभले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भविष्यातील समाजातील गरीब घटकांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाभर असे नवनवीन उपक्रम त्यांच्या मार्गदर्शानाखाली आयोजन करुन समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहू.

नारशिंगे येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, खजिनदार गणेश कांबळे, प्रवक्ता संगम धावडे, सल्लागार मोहन पवार, सदस्य संदेश धावडे, विजय धावडे, राहुल धावडे, सचिन धावडे, निलेश कळंबटे, सुदिप पवार, नितिन रोडे, प्रशांत कांबळे, शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा प्राजक्ता गोताड, ग्रामपंचायत सदस्य अंजली आग्रे, पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य प्रविण रोडे, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे विशाळ कांबळे यांच्या हस्ते वही, पेन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा प्राजक्ता गोताड, ग्रामपंचायत सदस्य अंजली आग्रे, पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य प्रविण रोडे, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे विशाळ कांबळे जिल्हा परिषद शाळा नारशिंगे चे शिक्षक राहुल दुधाळे, पंढरीनाथ जाजनुरे आदी उपस्थित होते.

Previous articleकुत्र्यांनी उगवला सूड
Next articleदौंड तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने महिलांना अल्पदरात तीर्थायात्रा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.