Home कोकण यंदा गणेशोत्सवासाठी चाकरमान्याची कोकणाकडे कुच!

यंदा गणेशोत्सवासाठी चाकरमान्याची कोकणाकडे कुच!

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0034.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: यंदा गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे कुच! कोरोनाच्या प्रदीर्घकाळानंतर गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात, त्याचबरोबर देशभरामध्ये उत्साहात पार पडत असताना रत्नागिरी, कोकण या ठिकाणी गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामध्ये मुंबई- गोवा महामार्गावर वाहतुकाची कोंडी पहायला मिळते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्व सुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. गणेश भक्तांसाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या सर्व गाड्यांसाठी टोल माफी सरकारने जाहीर केली आहे. त्या टोल माफीसाठी वाहतूक विभाग चौकी मध्ये पास ची सोय करण्यात आली आहे. तेव्हा वाहतूक विभाग चौकी मध्ये प्रवाशांना ठिकाण, प्रवास, परतीचा मार्ग कुठून-कुठे प्रवास याची नोंद करायची आहे. मुंबईमधून कुर्ला-नेहरू नगर बस स्थानकात आज १२५ तर उद्या १५० पेक्षा जास्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात आले आहेत. कोकणाचा गौरी गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. त्यासाठी हे चाकरमानी कोकण कडे जात असतात, यादरम्यान मुंबई मधून मोदी एक्सप्रेस कोकणाकडे रवाना झाली. त्यासाठी भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला .मुंबईमधून कोकणात जाण्यासाठी लाल परी सज्ज आहे. त्या लाल परी मधून जाण्यासाठी चाकरमानी त्याचबरोबर अनेक नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर जाण्यासाठी उत्सुक आहेत. कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी या महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांची देखरेख चालू आहे .एकंदरीतच यावर्षी कोकणामध्ये गौरी गणपतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार हे नक्की.

Previous articleउद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन
Next articleउपोषणाला बसलेल्या एका लहान चिमुरडीचा मृत्यू?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here