Home कोकण केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0044.jpg

केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

अलिबाग,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये आयोजित शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या सद्य:स्थितीबाबत सादरीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले प्रयत्न त्यांचे आचार, विचार, लोकाभिमुख धोरण तसेच केंद्राच्या विविध लोकोपयोगी योजना यांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत कार्यक्रम केंद्राने हाती घेतल्यानंतर अनेक गावे स्वच्छ झालेली दिसत आहेत. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून गाव, वस्ती वाडीवर अजून काही प्रश्न, समस्या असतील तर त्या जाणून घेवून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले. आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी विविध योजनांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसहित विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभार्थ्यांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदार कार्डचे आधार लिंक करण्याबाबत तसेच “माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार” या स्पर्धेची माहिती देण्यासाठी व आधार लिंक करण्यासाठी दालन उभारण्यात आले होते. या दालनाद्वारे जवळपास 41 मतदारांचे आधार लिंक करण्यात आले आहे.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.गणेश देशमुख, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार यांनी केले.

Previous articleठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटाच्‍या प्रवक्तेपदी नियुक्ती
Next articleगोगटे-जोगळेकर महाविद्यालयात औषधी वनस्पती, रानभाजी प्रदर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here