Home मुंबई स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबईच्यावतीने महापरीनिर्वाण दिनानिमित्त...

स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबईच्यावतीने महापरीनिर्वाण दिनानिमित्त दादर शिवाजीपार्क येथे श्रमदान

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_063314.jpg

स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबईच्यावतीने महापरीनिर्वाण दिनानिमित्त दादर शिवाजीपार्क येथे श्रमदान.                मुंबई,सौ.सविता तावरे स्पेशल रिपोर्टर
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष श्री. दीपकजी कांबळे व मुख्य कार्यकारी महासचिव श्री. कमलेश शेवाळे (देवा) सर यांच्या निर्देशानुसार,
परमपूज्य बोधीसत्व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरीनिर्वाणादिनी म्हणजेच आज दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने चैत्यभूमीवर जाऊन श्रमदान करण्यात आले.
याप्रसंगी, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि महिती अधिकार संघटनेच्या संचालिका तथा मुंबई अध्यक्षा सविताताई तावरे, मुंबई विभाग प्रभारी मालतेशसर हेब्बारे, मुंबई विभाग उपाध्यक्ष सुरेश रेवणकर, मुंबई विभाग संघटक वैशालीताई कांबळे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप वाघमारेसर, ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष मंगेश गायकवाड व प्रतिभा भालेराव, ईशान्य मुंबई जिल्हा सहसंपर्कप्रमुख माधुरी परब व पद्मा मलवळकर, ईशान्य मुंबई जिल्हा समन्वयक ज्योतीताई पाटेकर, ईशान्य मुंबई जिल्हा संघटक मनीषा मोरे, मानखुर्द सहसचिव संध्याराणी बिरादर, मानखुर्द सहसंघटक अलका नागटिळक, चेंबूर शाखा सचिव सौ उज्ज्वला मोरे , विक्रोळी तालुका उपाध्यक्षा लता कांबळे, घाटकोपर तालुका कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली आणि विरार शहर अध्यक्षा सुरेखा कोकरे आदी पदाधिकाऱ्यांनी चैत्यभूमीवर उपस्थित राहून येणार्‍या भीमसैनिकांना बाटलीबंद पिण्याचे पाणी, बिस्किट पूडे यांचे वाटप केले. तत्पूर्वी, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या संचालिका तथा मुंबई अध्यक्ष सविताताई तावरे, ईशान्य मुंबई जिल्हा सहसंपर्कप्रमुख माधुरी परब आणि घाटकोपर कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली आदी पदाधिकाऱ्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले.
तसेच, समता सैनिक दल शिबीर, लेणी संवर्धन समिती शिबीर, डॉक्टर प्रफुल्ल लोखंडे यांचे शांतिनिकेतन हॉस्पिटल आणि समाज प्रबोधन सेवा संघ यांचे वैद्यकीय शिबीर, विकास प्रतिष्ठान यांचे नेत्र चिकित्सा शिबीर या ठिकाणी आपला सहभाग नोंदविला आणि श्रमदान करत शिबीर परिसराची स्वच्छता केली. ह्या स्वच्छता मोहिमेत सर्विस सिव्हिल इंटरनॅशनल इंडियाचे प्रभाकर कांबळे, पंजाबराव कांबळे, दीपक नंदनवार आदी पदाधिकाऱ्यांनी हातभार लावला. ह्या सर्व कार्यक्रमास नालंदा बुद्ध विहार भटवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या सहकार्याने भोजन वाटप अतिशय शिस्तीत करण्यात आले.तसेच, ईशान्य मुंबई जिल्हा समन्वयक ज्योतीताई पाटेकर यांचे विशेष आभार आम्ही मानतो कारण त्यांच्या प्रयत्नानेच चैत्यभूमीवर उभारलेल्या वैद्यकीय शिबिरामध्ये सहभागी होण्याची व श्रमदान करण्याची संधी आम्हाला मिळाली.

Previous articleशहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे
Next articleमारुंजी श्री विठ्ठल रुक्माई राम लक्ष्मण सीता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here