• Home
  • 🛑 *ड्युटीच्या वादातून दोन महीला पोलीसांनमध्ये तुफान हाणामारी…..! पुणे मुख्यालयातील प्रकार* 🛑

🛑 *ड्युटीच्या वादातून दोन महीला पोलीसांनमध्ये तुफान हाणामारी…..! पुणे मुख्यालयातील प्रकार* 🛑

🛑 *ड्युटीच्या वादातून दोन महीला पोलीसांनमध्ये तुफान हाणामारी…..! पुणे मुख्यालयातील प्रकार* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तेथे चक्क दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली आहे. ही मारामारी ड्युटीच्या वादावरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन्ही महिला पोलीस मुख्यालयामध्ये काम करतात. एक पोलीस नाईक तर दुसरी महिला ही पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. या दोघींमध्ये ड्युटीच्या कारणावरून वाद सुरू झाले. त्या दोघींमध्ये आधी शाब्दिक बातचीत झाली.

त्यानंतर त्यांचे भांडण सुरु झाले. आणि त्यानंतर त्यांनी एकमेकींना शिवीगाळ केली. हा वाद वाढतच गेला आणि यामुळे पोलीस शिपाई महिलेने पोलीस नाईक महिलेवर हात उचलला. आणि यामुळे वाद अजूनच वाढला गेला.

हा प्रकार पोलीस मुख्यालयामध्ये पोहचला. या मुख्यालयाचे प्रभारी पोलीस उपाआयुक्त मितेश घट्टे यांनी या सर्व प्रकाराची दखल घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

असे प्रकार इथे चालणार नाहीत असे ही त्यांनी ठणकावून सांगितले…⭕

anews Banner

Leave A Comment