Home जालना शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे

शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे

42
0

आशाताई बच्छाव

IMG_20231206_072132.jpg

शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी गणेश वाघमारे
आ. कैलाश गोरंट्याल यांच्याहस्ते नियुक्ती पत्र प्रदान
जालना (दिलीप बोंडे) ः जालना शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्षपदी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते गणेश बाळाजी वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी यांनी नुकतेच जारी केले आहे.
नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षांमध्ये विविध पदावर संघटनेचे काम करीत आले आहे, यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने सदरील नियुक्ती केली आहे. आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवार रोजी गणेश वाघमारे यांना नियुक्ती पत्र प्रदान करून अभिनंदन केले आहे. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत विनोद यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रीय ओबीसीचे समन्वयक राजेंद्र राख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेख ईब्राहिम, शहर काँग्रेसचे अध्यक्ष वैभव उगले, डॉ. विशाल धानुरे, बाबासाहेब सोनवणे, अनिल वाघमारे, हरीश आनंद, जावेद अली, गणेश चांदोडे आदिंनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here