Home उतर महाराष्ट्र उम्मती’चा सर्वरोग निदान शिबीर संपन्न

उम्मती’चा सर्वरोग निदान शिबीर संपन्न

105
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_063443.jpg

‘उम्मती’चा सर्वरोग निदान शिबीर संपन्न                    श्रीरामपूर (दिपक कदम तालुका प्रतिनिधी)

उम्मती सोशल वेलफेयर सोसायटी आणि मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अँग्लो उर्दु हायस्कुल, श्रीरामपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील जनतेला तज्ञ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबीर उम्मती चे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे हे सातवे वर्ष आहे. यावेळी मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेरचे प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. सुनील दिघे हे स्वतः हॉस्पिटलच्या इतर सर्व तज्ज्ञ डॉक्टरवर्ग व टीमसहित उपस्थित होते.
सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कुमार चोथाणी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंतराव जमदाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, श्रीरामपूर शहर पोलीस उपनिरीक्षक नितीन देशमुख, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री.व सौं. संजय साळवे, मिस्टर इंडिया ऍड. सौरभ गदिया आदी उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी शिबिरात श्रीरामपूर तालुक्यामधील सुमारे 110 रुग्णांच्या हृदयरोग, मेंदूविकार, मणक्याच्या तक्रारी, स्त्रीरोग, मुतखडा, रक्तदाब, मूत्रविकार अशा विविध आजारांवर उपचार करण्यात आले. पैकी सुमारे 27 रुग्णांना पुढील तपासणीसाठी मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे संदर्भीत करण्यात आले.यावेळी मेडिकव्हरचे मधुमेहतज्ज्ञ डॉ.जगदीश वाबळे , युरोलॉजिस्ट डॉ.वैभव कांबळे , स्त्रीरोगतज्ञ डॉ. सागर कोतकर तसेच डॉ. पूजा शिंदे यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य औषधोपचार केले. तसेच यावेळी ईसीजी, रक्तशर्करा, बीपी, आदी तपासण्या संपूर्णपणे मोफत करण्यात आल्या त्यासाठी श्री. सागर अडागळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
यावेळी उम्मतीचे सचिव डॉ. तौफिक शेख यांनी स्वकमाईतुन त्यांचे वडील पै. रफीक एन. शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अपंग व्यक्तींसाठी व्हील चेयर, कुबड्या, वॉकर व स्टिकचे वाटपदेखील मान्यवरांच्या हस्ते केले. यावेळी मुफ्ती रिजवान हसन यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी याचे अनुकरण करावे असे सांगितले. डॉ. जमदाडे यांनी ‘उम्मती’च्या गेल्या दहा वर्षातील घोडदौडीचा आढावा घेत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. अपंग संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय साळवे यांनी ‘उम्मती’ च्या पुढील शिबिरासाठी ‘सहर्षा हॉल’ उपलब्ध असेल अशी ग्वाही दिली. डॉ.कुमार चोथाणी, निरीक्षक नितीन देखमुख यांनीदेखील आपले मनोगते व्यक्त केले. यावेळी उम्मती तर्फे सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
शिबिराचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ व ऍड. आरिफ शेख यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तौफिक शेख यांनी केले.पाहुण्यांचा परिचय शहानवाज सर यांनी तर आभारप्रदर्शन फिरोज पठाण सर यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल शेख, युसूफ लाखानी, डॉ. सुदर्शन रानवडे, शाकीफ शेख, असलम सय्यद, वसीम जहागीरदार, समीर शेख, अलीम बागवान, शाहरुख बागवान, इरफान शेख, फारूक मेमन, इसाक शेख , माजिद मिर्जा, साजिद सर, मतीन सर, अनिस शेख, डॉ. अहतेशाम शेख, डॉ. नावेद खान,विशाल शिंगाडे, जकी शेख, मोहसीन बागवान, दानिश शेख, मलंग शेख, मोईन मन्सूरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleसंवाद
Next articleराहुरीतील वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here