• Home
  • नायगाव खैरगाव कुंटूर रोडवर बैलगाडी सोबतच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार..

नायगाव खैरगाव कुंटूर रोडवर बैलगाडी सोबतच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0055.jpg

नायगाव खैरगाव कुंटूर रोडवर बैलगाडी सोबतच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव कुंटूर फाटा ते कुंटूर तांडा दरम्यान मोटरसायकल व बैलगाडीच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक 22 12 2020 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की बळेगाव परिसरात आपल्या चांगल्या स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले माधवराव मोहनराव पाटील बेलकर रा. बळेगाव हे ग्रामपंचायत निवडणुकीचे काम आटोपून नायगावहून कुंटूर मार्गे गावाकडे जात असताना कुंटूर फाट्याहून गावाकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी रस्त्यात आलेली बैलगाडी त्यांना न दिसल्यामुळे त्यांची मोटरसायकलची बैलगाडीस जबरदस्त धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्यात जबर मार लागल्याने माधवराव पाटील हे जागीच ठार झाले या अपघाताची वार्ता समजताच गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.

anews Banner

Leave A Comment