Home बुलढाणा सर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

सर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

169

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0014.jpg

सर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी शेतकरी वर्गाकडुन मागणी

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यात विजेच्या गर्जना, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे खुप नुकसान झाले शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे त्या करीता झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे सर्वे करुन संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील सर्वत्र शेतकरी वर्गाकडुन होत आहे.

संग्रामपूर तालुक्यातील शिवणी सोनबर्डी, आलेवाडी लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी सालवन, दयालनगर, हडियामाल सोनाळासह वानखेड पातुर्डा संग्रामपूर बहुताश गावात
विजेच्या गर्जना, वादळी वाऱ्यासह १० सप्टेंबर तसेच ११ सप्टेंबर रोजी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कपाशी, मक्का, सोयाबीन पीक पूर्णता जमीन दोस्त झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. याचा इतर पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे महसूल मंडळ विभागाने नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करून शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous articleअनसिंग येथे राज साहेब हिंदू आखाड्याचे उद्घाटन
Next articleपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा- अॅड. दीपक पटवर्धन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.