Home अमरावती आनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा...

आनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.

25
0

आशाताई बच्छाव

1000266371.jpg

आनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.
____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा .प्रतिनिधी
अमरावती.
कार्यकर्त्याच्या आग्रस्त तसेच मिळणारा पाठिंबामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी अखेर निर्णय बदलून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या अग्रस्थ तसेच मिळणाऱ्या पाठिंबामुळे आपण निर्णय बदलण्याचे त्यांनी स्पष्ट केले.डा. बाबासाहेब आंबेडकर चे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी”रिपब्लिकन सेना”या पक्षावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेल्या त्यांच्या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ एप्रिलला सायंकाळी आपण उमेदवारी मागत असल्याची जाहीर पत्र काढून”वंचित”ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराव आंबेडकर यांना पाठिंबा देत”वंचित”चा उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे पत्र काढले होते. मात्र यानंतरही आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा फसवा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी मागं घेण्याचा निर्णय व ते ठाम असल्याचे जाहीर केले होते
त्यानंतर मागील दोन दिवसापासून ते आपल्या निर्णयाबद्दल मौन बाळगून होते. अशातच त्यांनी रविवारी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अमरावती मधून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारा एकही पक्ष नसल्याने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वारंवार आग्रहामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर,”वंचित”चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल बर्डे आदी उपस्थित होते.

Previous articleमोतीगव्हाण येथे शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद विकोपाला
Next articleसमाजसेवक मांगीलाल पुरोहित यांनी ३ एकर जमीन केली दान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here