Home पुणे हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापोडीत...

हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापोडीत साजरा 

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0038.jpg

हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापोडीत साजरा
पिंपरी चिंचवड उमेश पाटील
संजय नाना काटे युवा मंच दापोडी यांच्यावतीने हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापोडी मध्ये साजरा करण्यात आला यावेळी स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस संजय नाना काटे व सुरेंद्र पागेदार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले व तसेच त्यानिमित्त क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अजित सिंग कोचर दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते बॉक्सिंग श्रीधर तांबा राष्ट्रीय हॉकी कोच संतोष म्हात्रे आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग कोच सदानंद साबळे क्रीडा संघटक बलभीम भोसले क्रीडा शिक्षक चंद्रकांत सोनवणे क्रीडा शिक्षक यांना क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या क्रीडा गुरूंचा क्रीडा जीवनगौरव पुरस्कार 2022 माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड संजय नाना काटे यांच्या शुभ हस्ते शाल त्रिफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजित सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज क्रीडा मध्ये आपल्या देशासाठी पदक मिळवणे चालू झाले आहे ही खरोखरच क्रीडा क्षेत्रात आनंदाची बाब आहे त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी खेळासाठी वेगळे नियोजन करावे तरच ते देशाचे पुढील खेळाडू घडू शकतात खेळाडूंनी नेहमी आई-वडिलांचा सन्मान करत असताना व्यसनापासून दूर राहावे आज व्यसन हे लहान मुलांच्या आयुष्यात लवकर येत आहे ही एक दुःखाची बाब आहे म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांकडे खूप लक्ष द्यावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी संतोष काटे विजय शिंदे विराज काटे अमर खंडागळे कृष्णा मोरे गुलाब काटे सुरेश काटे अदी विविध क्षेत्रातील खेळाडू व मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बाराथे व आभार प्रदर्शन अनिल मोरे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here