• Home
  • 🛑 ” गोल्ड मास्क मॅन “.. तब्बल एवढ्या किंमतीचा सोन्याचा मास्क घालून ते फिरतात 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ” गोल्ड मास्क मॅन “.. तब्बल एवढ्या किंमतीचा सोन्याचा मास्क घालून ते फिरतात 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 ” गोल्ड मास्क मॅन “.. तब्बल एवढ्या किंमतीचा सोन्याचा मास्क घालून ते फिरतात 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुणे तिथं काय उणे अशी पुण्याची एक म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. कारण, पुण्यातील लोकं हे कशातच मागे नसतात. कोरोनातही पुणेकर आघाडीवर आहेत, असे म्हणत जोक्स व्हायरल होताना आपण पाहिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून राज्यातील पहिला रुग्णही पुण्यातच आढळून आला होता. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी पुणेकर आपली काळजी घेत आहेत. आता, पिंपरी चिंचवडमधील एका हौशी व्यक्तीने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी बनवलेला हा मास्क चर्चेचा विषय आहे. पुणे आणि सोनं हे जुनचं नातं आहे, कारण पहिला गोल्ड मॅन हा पुण्यातीलच होता. मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे हे गोल्ड मॅन म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. त्यानंतर, आणखी गोल्ड मॅन पुण्यात पाहायला मिळाले. मात्र, याच पुण्याजवळी पिंपरी चिंचवडमध्ये आता, गोल्ड मास्क मॅन दिसून येत आहे. पिंपरी चिंचवडमधील रहिवाशी असलेले शंकर कुराडे यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. या मास्कची किंमत तब्बल 3 लाख रुपयांच्याजवळ आहे.
पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात संक्रमण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मास्क आणि सॅनिटायजर्सचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळए, मास्क व सॅनिटायजर्सं वापरणे प्रत्येकाला बंधनकार बनले आहे. पिंपरी चिंचवडमधील शंकर कुराडे यांनी गोल्डन मास्क बनवून घेतला आहे. सध्या गोल्डन मास्क परिधान करुनच ते बाजारात आणि घराबाहेर पडत आहेत. या मास्कला लहान-लहान छिद्र असल्याने श्वास घेण्यास कुठलाही त्रास होत नसल्याचे कुराडे यांनी म्हटले. हा मास्क किती प्रभावशाली आहे, हे मला माहिती नाही, असेही ते म्हणाले…..⭕

anews Banner

Leave A Comment