• Home
  • 🛑 प्रसिद्ध अभिनेत्री करणार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…! 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 प्रसिद्ध अभिनेत्री करणार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…! 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 प्रसिद्ध अभिनेत्री करणार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. 7 जुलै रोजी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील निसर्ग या कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती कळतीये. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबतचं सविस्तर वृत्त सकाळने दिलं आहे.प्रिया बेर्डे यांच्यासोबत चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार-तंत्रज्ञ देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा समावेश आहे.
पुणे शहर फार महत्त्वाचं आहे. या शहरामधूनच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या कामाची सुरूवात झाली होती. तसंच बेर्डे कुटुंबासाठी हे शहर फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्यामुळे माझ्या नव्या कारकीर्दीला देखील पुण्यातून सुरूवात करण्याची इच्छा आहे. पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कलाकारांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं…⭕

anews Banner

Leave A Comment