Home पुणे ऑनलाइन टेंडर मध्ये चुका केल्याने सीईओ यांनी कर्मचाऱ्याला केले निलंबित

ऑनलाइन टेंडर मध्ये चुका केल्याने सीईओ यांनी कर्मचाऱ्याला केले निलंबित

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0044.jpg

ऑनलाइन टेंडर मध्ये चुका केल्याने सीईओ यांनी कर्मचाऱ्याला केले निलंबित

क्लर्कच्या जागी प्रशासनाने बसविले ड्रायव्हरला

खडकी,(प्रतिनिधी उमेश पाटील) : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत चुक केल्याच्या कारणावरून बोर्डांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने काढण्यात येणार्या टेंडरमध्ये चूक झाली आहे. विशेष म्हणजे टेंडर काढण्यासाठी क्लर्कच्या जागेवर प्रशासनाने चक्क एका ड्रायव्हरची नियुक्ती केली आहे. क्लर्कच्या जागेसाठी ड्रायव्हरची वर्णी लावण्यात आली असल्याने बोर्ड प्रशासनाने क्लार्कच्या पोस्ट वर्षानुवर्षे का भरल्या नाहीत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने ऑनलाइन टेंडर प्रक्रिया काढण्याचे काम सुरू होते. ऑनलाईन टेंडरसाठी बोर्डाचे सीईओ रॉबिन बलेचा यांनी कर्मचारी बापू भालेराव याला काही सूचना केल्या होत्या, मात्र भालेराव याने सीईओच्या सूचना पायदळी तुडवीत मनमानी पध्दतीने टेंडर मध्ये काही घोळ केला. टेंडरमध्ये सीईओ यांच्या आदेश धुडकावित भालेराव यांनी मनमानी पध्दतीने केलेले घोळ हे कोणत्या ठेकेदारांसाठी फायद्याचे होते हेदेखील तपासणे आता गरजेचे झाले आहे.
टेंडरमध्ये चुकीचे पॉईंट टाकण्यात आल्याचे समजताच सीईओ यांनी तातडीने भालेराव यांना निलंबित केले. दरम्यान आरोग्य विभागाच्या क्लर्क पदावर सफाई कर्मचारी म्हणून नेमणूक झालेल्या बापू भालेराव यांची नेमणूक करण्यात आली आहे. कालांतराने भालेराव याला ड्रायव्हर म्हणून घेण्यात आले होते. मात्र क्लर्क या पदावर ड्रायव्हर भालेराव याला बसविण्यात आल्याने किती विश्वासहार्थाने कार्यालयीन काम होतील असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. दरम्यान वर्षानुवर्षे बोर्डामध्ये अनेक पदे का भरण्यात आली नाही असा प्रश्न आहे निर्माण झाला आहे.

कोट
आरोग्य विभागाच्या वतीने टेंडर काढण्यात येत आहे, टेंडरसाठी बापू भालेराव यांनी चूक केली असल्याचे सीईओ यांना निदर्शनास आले आहे. सीईओ यांनी तडकाफडकी भालेराव यांना निलंबित केले असून याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
शिरीष पत्की
आरोग्य अधीक्षक

Previous articleउपोषणाला बसलेल्या एका लहान चिमुरडीचा मृत्यू?
Next articleहॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दापोडीत साजरा 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here