Home गडचिरोली !! तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व मोर्चाच्या समर्थनार्थ...

!! तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व मोर्चाच्या समर्थनार्थ चामोर्शी शहर कडकडीत बंद !

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20221111-WA0043.jpg

!! तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
व मोर्चाच्या समर्थनार्थ चामोर्शी शहर कडकडीत बंद !!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी येथील संताजी क्रीडांगण शिवम अगरबत्ती प्रकल्प येथून आज शुक्रवार दिनांक आज 11 नोहेंबर 2022 रोज शुक्रवारी तालुका खरेदी विक्री सह. मर्या चामोर्शी येथे भागधारक सभासद यांची नावे बेकायदेशीर रित्या मतदार यादीतून वगळण्यात आल्या बद्दल व येथील अनेक शेतकऱ्यांचे सभासदत्व चामोर्शी खरेदी विक्री संस्थेतून रद्द केल्याच्या निषेधार्थ
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते ,युवा नेते स्वप्नील भाऊ वरघंटे यांचे मार्गदर्शनात नगरसेवक आषिश भाऊ पिपरे, रमेश भाऊ अधिकारी यांच्या पुढाकाराने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते व या मोर्चाचे समर्थनार्थ चामोर्शी शहर कडकडीत बंदचे जाहीर आवाहन करण्यात आले व सदर कडकडीत बंद आज पूर्णपणे यशस्वी झाला व या आज झालेल्या चामोर्शी येथील कडकडीत बंद व मोर्चात चामोर्शी येथील खरेदी विक्री संघात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायावर तालुक्यातून आलेल्या मोर्चेकरी बांधवांनी तीव्र नाराजी व निषेध व्यक्त केली व जोपर्यंत खरेदी विक्री संघाची निवडणूक रद्द होणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही व शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून तालुक्यातील भागधारक शेतकरी शेतमजुर यांना न्याय मिळवून देण्यासाठी व आजपर्यंत खरेदी विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी प्रामुख्याने तालुक्यातील बेकायदेशीर रद्द करण्यात आलेल्या सभासदांना सभासदत्व मिळवून देणे,मतदार यादीतून वगळण्यात आलेले पुन्हा समाविष्ट करण्यात यावे ,नवीन सभासदांची नावे नोंदणी करणे मय्यत सभासदांच्या वारसदारांना सभासदत्व मिळवून देणे व अनेक प्रमुख संस्थेच्या अनेक अन्यायकारक विषयावर सदर धडक मोर्चाचे समर्थनार्थ चामोर्शी शहर कडकडीत बंद चे आयोजन करण्यात आले व या बंद व मोर्चाला चामोर्शी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आज चामोर्शी शहर शंभर टक्के बंद ठेवला यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांनी हा अन्याय सहन केल्या जाणार नाही असा इशारा दिला सदर मोर्चा शहरातून तालुका खरेदी विक्री संघावर नेण्यात आले व त्याठिकाणी तहसीलदार तालुका निबंधक यांना खरेदी विक्री संघ व्यवस्थापक , पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत मोर्चातील मागण्याचे निवेदन देण्यात आले आजच्या बंद व मोर्चाचे आयोजन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते
युवा नेते स्वप्नील भाऊ वरघंटे यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक आशीष भाऊ पिपरे, गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने धडक मोर्चा व चामोर्शी शहर कडकडीत बंद पुकारण्यात आला या बंद व निषेध मोर्चा करण्यासाठी तालुक्यातील खरेदी विक्री संघातील अन्यायग्रस्त भागधारक शेतकरी शेतमजूर व विविध गावातील शेकडो शेतकरी शेतमजूर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा चामोर्शी शहर कडकडीत बंद ठेवण्यासाठी खरेदी विक्री संघात अन्याय झालेल्या भागधारक शेतकरी शेतमजूर यांनी समस्त शहर वासिय जनता तथा प्रामुख्याने
अशोक धोडरे , निखिल धोडरे सुभाष कोठारे ,निकेश जूवारे ,सुभाष लटारे , लक्ष्मण वासेकर ,विनोद किरमे , प्रशांत मंडल , रतन मंडल , नेपाल ढाली , राकेश पिपरे ,मुकुल सरकार , ममता अधिकारी , मनेश भांडेकर , भारत धोडरे ,बंडू नैताम व शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम केला

Previous articleभाजपच्या महिला मेळाव्यासाठी गडचिरोलीत नियोजन बैठक
Next articleझाडे समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडविल्यास शिवाय स्वस्थ बसणार नाही आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here