Home गडचिरोली झाडे समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडविल्यास शिवाय स्वस्थ बसणार नाही आमदार डॉक्टर...

झाडे समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडविल्यास शिवाय स्वस्थ बसणार नाही आमदार डॉक्टर देवरावजी होळी

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20221111-WA0044.jpg

झाडे समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडविल्यास शिवाय स्वस्थ बसणार नाही

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथील झाडे समाजाच्या आमरण उपोषणाची आ. डॉ. देवरावजी होळी यांचे हस्ते सांगता

मागासवर्ग आयोगाने या समाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करावी अशी मागणी

लिंबू पाणी पाजून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सोडविले आमरण उपोषण

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

झाडे झाडिया समूहातील समाजाच्या समस्या व प्रश्न सोडविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी झाडे या समूहातील समाजाच्या आमरण उपोषणाच्या प्रसंगी उपोषणकर्त्यांना देत इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे दिनांक ३० सप्टेंबर पासून सुरू असलेले झाडे समाजाचे आमरण उपोषण अखेर आपल्या यशस्वी शिष्टातून सोडविले.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या समाजाचे नेते डॉ. सुशील कोहाड व उपोषण कर्त्याना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.

यावेळी त्यांनी मागासवर्ग आयोगाने या समाजाच्या आरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करावी अशी मागणीही केली

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात झाडे ,झाडीया, झाडे कुणबी, झाडे कापू ,झाडे कापेवार ही झाडे या एका समूहाची जमात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या समाजाला पूर्वी एन.टी.सी चे प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु विद्यमान परिस्थितीमध्ये सदर प्रमाणपत्र देण्यास निर्बंध आल्याने या समाजातील विद्यार्थी व नौकरवर्ग यांच्यावर फार मोठे संकट ओढावलेले आहे .त्यामुळे या समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी आमरण उपोषण जाहीर केले होते. या उपोषण मंडपाला आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी भेट देऊन आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही शासन स्तरावर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी या आंदोलनाच्या सांगता प्रसंगी उपोषण कर्त्याना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here