Home गडचिरोली सुरज कोडापे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ….आमदार डॉक्टर देवरावजी होळी...

सुरज कोडापे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ….आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन!! …

71
0

आशाताई बच्छाव

1000303294.jpg

सुरज कोडापे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल ….आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन!! …

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नंबर दोन येथील सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागात राहणारे सुरज कोडापे. यांनी आपल्या मेहनती व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने त्यांची महाराष्ट्र शासनाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन केले.
सुरज कोडापे हा सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने वडिलांच्या संस्काराचा वारसा घेऊन त्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वाटचाल केली.आणि महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून “परिश्रमाशिवाय यश मिळत नाही” या युक्तीप्रमाणे त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले. आणि हे यश संपादन केले.त्यांने आपले शिक्षण PG Journalism मध्ये केल्याने काही दिवस पत्रकार म्हणून सुद्धा काम केलेले आहे. तेव्हा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित प्रामुख्याने परिवारातील सदस्यांसह ,जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, रोशनजी कुमरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रतीक राठी, युवा नेता सोनू कुमरे, सौरव गौरकार, कृष्णा नैताम, संतोष चिचघरे आदी उपस्थित होते.

Previous articleडॉ.रवींद्र भोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राइड आयकॉन अवॉर्ड प्रदान —
Next articleपत्रकारांची लेखणी निपक्ष असावी -राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here