Home महाराष्ट्र रेशन कार्डधारकांनो सावधान; १ तारखेपासून तुमच्यावर मोठे गंडातर!

रेशन कार्डधारकांनो सावधान; १ तारखेपासून तुमच्यावर मोठे गंडातर!

104
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220824-113405_Google.jpg

रेशन कार्डधारकांनो सावधान; १ तारखेपासून तुमच्यावर मोठे गंडातर!
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
शासनाने एक मोठा धाडसी निर्णय घेतलेला असून,त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२२ पासून केली जाणार आहे,त्यामुळे आपल्यावर मोठे गंडातर येण्याची दाट शक्यता आहे.जे रेशनकार्डधारक अन्न सुरक्षा योजनेचा दरमहा लाभ घेऊन रेशन घेत आहेत,अशा लाभार्थीमध्ये शासकीय नोकर,निमशासकीय नोकर,व्यावसायिक,किराणा दुकानदार,पेन्शन धारक,ट्रँक्टर असणारे बागातदार शेतकरी,मोठ मोठ्या कंपनीत काम करणारे,तसेच साखर कारखान्यात परमंन्ट असणारे कामगार,आयकर भरणारे,पक्के घर (स्लँब बिल्डींग) असणारे,चारचाकी वाहन(घरगुती अथवा व्यावसायिक ) असणाऱ्या रेशनकार्डधारकांनी ३१ आँगस्ट २०२२ पर्यत स्वतः स्वइच्छेने अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे व तसा फाँर्म भरुन द्यावा.अन्यथा १ सप्टेंबर २०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी गावागावात शहनिशा करुन अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावानुसार रक्कम वसूल करुन फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तर या मोहिमेची सुरुवात पुणे जिल्ह्यातून सुरु करण्यात आली आहे.

Previous articleसागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ५० ठिकाणी स्वच्छ सागर तट अभियान १७ सप्टेंबरला आयोजन
Next article50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईल -मंत्री दीपक केसरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here