Home महाराष्ट्र एजंट-अभिकर्ता नियुक्तीसाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

एजंट-अभिकर्ता नियुक्तीसाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

66
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230712-204149_Google.jpg

मालेगाव, दि. 12 जुलै ,2023  (उमाका वृत्तसेवा):

मालेगाव टपाल विभागांतर्गत टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा करीता एजंट – अभिकर्ता नियुक्ती थेट मुलाखत  18 जुलैपर्यंत डाक अधिक्षक कार्यालय, मालेगाव यांच्या पत्यावर रजिस्टर पोस्टाने अर्ज सादर करावेत. अर्जासोबत चार छायाचित्र, दहावीचे मार्कसिट, पॅनकार्ड, आधार कार्ड झेरॉक्स जोडावेत. अर्जचा नमूना डाक अधीक्षक कार्यालय मालेगाव तसेच पोस्टमास्तर मालेगाव हेड पोस्ट ऑफिस येथे उपलब्ध असून  इच्छुक उमेदवारांनी   अधिक माहितीसाठी विकास अधिकारी डी. डी. पवार यांच्या. 9588470773, भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक भरत पगार यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

मालेगाव टपाल विभागातंर्गत  टपाल जीवन विमा  तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा करिता एजंट – अभिकर्ता नियुक्ती थेट नियुक्तीसाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 वर्षे असावे, शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त केंद्रीय, राज्य सरकारी बोर्ड, संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण असावे, संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे, इतर कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा, उत्तीर्ण उमेदवास 5 हजार रुपये सिक्युरिटी डीपॉझीट स्वरुपात भरणे बंधनकारक राहील, उमेवारास अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल, बेरोजगार, स्वयंरोजगर व्यक्ती, सेवानिवृत्त सैनिक, माजी विमा प्रतिनिधी, म्हणून काम केलेला व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य, निवृत्त शिक्षक, बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि वरील अटी पूर्ण करणाऱ्या इच्छूक व्क्तींची नेमणुक मुलाखतीव्दारे करण्यात येईल.

  इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी डाक अधिक्षक मालेगाव विभाग,  दुसरा मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिग,  जुने बस स्टॅडसमोर मालेगाव येथे शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र (मुळ प्रमाणपत्र आणि छायांकित प्रत). पॅनकार्ड, आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज छायाचित्रासह वेळेवर उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 02554 – 235653 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मालेगाव डाक विभागाचे अधिक्षक श्री. पगार यांनी केले आहे.

Previous articleशासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मालेगाव तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण:तहसिलदारनितिनकुमार देवरे
Next articleराज्यातून देगलूर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार….!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here