Home भंडारा विखुरलेल्या पाखरांप्रमाणे तब्बल ३६ वर्षांनी भेटले तुमसर शाळेतील मित्र-मैत्रिणी..

विखुरलेल्या पाखरांप्रमाणे तब्बल ३६ वर्षांनी भेटले तुमसर शाळेतील मित्र-मैत्रिणी..

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_080917.jpg

विखुरलेल्या पाखरांप्रमाणे तब्बल ३६ वर्षांनी भेटले तुमसर शाळेतील मित्र-मैत्रिणी..

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) शालेय शिक्षण झाल्यानंतर आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. स्वतः चा शोध घ्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नसते. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.म्हणूनच
तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने मित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते स्नेह मेळाव्याचे. ज्यामुळे आपल्या जीवनातील जुन्या, गोड आठवणी पुन्हा एकदा या माजी विद्यार्थ्यांना अनुभवता आल्या. हा स्नेह मेळावा होता तुमसर नगर परिषद नेहरू महाविद्यालयातील वर्ग दहावीतील बॅच १९८८ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी हा स्नेहमेळावा नागपुर पासुन ४५ किमी.अंतरावर असलेल्या डालफिगो वाटरपार्क या ठिकाणी मोठया थाटामाठात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याची सुरूवात माजी विध्यार्थ्यांच्या उपस्थित औक्षण आणि फुलांची उधळण करत करण्यात आले.त्यानंतर ओळख परिचय, गाणी, करमणूक कार्यक्रम, स्नेहभोजन, जुन्या आठवणींना उजाळा असे कार्यक्रम पार पडले. यानंतर आरोग्याची काळजी,इत्यादी गोष्टीवर चर्चा करण्यात आली.आजच्या धकाधकीच्या जिवनात कामाच्या व्यापात प्रत्येक जण खूप गुंतलेला असुन स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे. परंतु वेळातवेळ काढून तुमसर येथील नेहरू विद्यालय शाळेतील जुने पुराणे मित्र, मैत्रिणी विखुरलेल्या पाखरांप्रमाणे ३६ वर्षांनंतर निसर्गाच्या सानिध्यात एकत्र आले.या स्नेह मेळाव्यात.. तुमसर वरुन अनिल कारेमोरे, कन्हैया बोरकर,निलेश काटकर, सुनिल कांबळे, रवि तिडके,जयवंत बडवाईक, विजय चिंधालोरे प्रकाश क्षीरसागर, सरिता गौरकर, मनोरमा डोंगरे,भंडारा वरुन कविता कमाने,उज्वल मेहर,तर नागपुर वरुन राजेश गजभिये , विजय साखरकर ,निता बडवाईक, सिमा बडवाईक,या सर्व मित्र मंडळींनी जुन्या आठवणी ना उजाळा देत पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा देत पुढल्या वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत आप आपल्या गावाकडे प्रस्थान केले.

———-@—————-@——@——–@—–
जुन्या आठवणी डोळ्यात येऊन डोळे पाणावले होते.

मुळात मैत्रीला कुठलीही बंधनं नाहीच. ना जातीचे, ना वयाचे, ना गरीबी-श्रीमंतीचे. सर्व समविचारी एकत्र आले की मैत्री तिथे ओघानेच येते. सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र आलं की मैत्री अधिक दृढ होत जाते.या मैत्रीत सदैव मायेचा ओलावा असतो. विचारपूस, काळजी, प्रसंगी भांडण, अबोला यामुळे मैत्रीत परिपक्वता येते.
तसं पाहिलं तर खरी मैत्री कधीच सिद्ध करावी लागत नाही.
नेहरू महाविद्यालय,तुमसर मध्ये १९८८ साली दहावीमध्ये शिकलेल्या वर्गामधील बेंचने एकत्र येऊन पुन्हा एकदा तोच कल्ला केला.तरुण झाल्याचा अनुभव घेतला. सोशलमीडिया किती प्रभावशाली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडियाचा वापर नेहमीच वेळ वाया घालविण्यासाठी होत नसून, काही विधायक कामांसाठी देखी उत्तम प्रकारे होऊ शकतो. जुन्या आठवणीनां उजाळा देण्यासाठी देखील याच सोशल मीडियाचा वापर आज केला जातो .अशाच प्रकारे १९८८ च्या दहावी बॅच मधील मित्र, मैत्रिणींचा शोध घेऊन, व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. यांनंतर सर्वांनी एकत्र भेटण्याचे ठरले, आणि नियोजित ठिकाणी, नियोजित वेळेत सर्वजण एकत्र आले.तब्बल ३६ वर्षानंतर सर्व काही वेगळे होते, पण मनात साठवून ठेवलेल्या जुन्या आठवणी डोळ्यात येऊन डोळे पाणावले देखील होते.याच आठवणी भविष्यातील येणाऱ्या दिवसांसाठी नवं जीवन जगण्याचा आनंद देणाऱ्या आहेत.अशी प्रतिक्रिया नेहरू विद्यालयातील माजी विध्यार्थी अनिल कारेमोरे यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केली.

Previous articleमाता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
Next articleसत्य घटना आणली जनतेपुढे – दिग्दर्शक सदानंद बोरकर मित्रांगण समुहाच्या ‘दोन घराचं गाव’ नाट्याला अकराशेंवर रसिकजणांची उपस्थिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here