Home भंडारा सत्य घटना आणली जनतेपुढे – दिग्दर्शक सदानंद बोरकर मित्रांगण समुहाच्या ‘दोन घराचं...

सत्य घटना आणली जनतेपुढे – दिग्दर्शक सदानंद बोरकर मित्रांगण समुहाच्या ‘दोन घराचं गाव’ नाट्याला अकराशेंवर रसिकजणांची उपस्थिती

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240220_081244.jpg

सत्य घटना आणली जनतेपुढे – दिग्दर्शक सदानंद बोरकर

मित्रांगण समुहाच्या ‘दोन घराचं गाव’ नाट्याला अकराशेंवर रसिकजणांची उपस्थिती

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) साकोली शहरातील मित्रांगण समुह वतीने शंकरपटानिमित्त रसिकांना मंत्रमुग्ध करणारी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत सर्वस्व गमावून बसलेल्या कुटुंबांची सत्य कहाणी श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगांव प्रस्तुत “दोन घराचं गाव” या नाट्यचा प्रयोग रविवार ( ता १८.) ला होमगार्ड परेड ग्राऊंडवर संपन्न झाला. यात अकराशेंच्या वर महिला पुरुष रसिकांची उपस्थिती होती हे विशेष. व नाटकाचे छायाचित्रण साकोली मिडीयाने केले.
नाटकाच्या उदघाटक प्रसंगी मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रा. होमराज कापगते, जि.प.सभापती मदन रामटेके, जि.प.स. वनिता डोये, ॲड. मनिष कापगते, प्रा.अर्चना बावणे, अश्विन नशिने, उमेश कठाणे व इतर मान्यवर हजर होते. “दोन घराचं गाव” ही केविलवाण्या संगीतावर हृदयस्पर्शी नाटक पहातांना पदोपदी रसिकांच्या डोळ्यात अश्रू येत सर्व स्तब्ध झाले होते. आणि शेवटी सर्व महिला डोळ्यात पाणी आणून नाटकाची प्रत्येकजण स्तुती करत होते. कारण भ्रष्ट कारभाराशी दोन हात करणारे आदिवासी कुटुंबाच्या रानातील संघर्षमय न्याय हक्कासाठी ही सत्य कहाणी प्रत्यक्ष जनतेनी अनुभवली. नाटकाच्या मध्यांतरात दिग्दर्शक सदानंद बोरकर यांची जनतेसमोर थेट मुलाखत पत्रकार रवी भोंगाने व कॅमेरामन आशिष चेडगे यांनी घेतली. यात सदानंद बोरकर यांनी सांगितले की ही कोकणातील सत्य घटनेवर आधारित नाट्य असून जेव्हा गरज होती तेव्हा शासनाने लाभ न देता जीवन संपविल्यानंतर त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आणि ती त्या कुटुंबाने नाकारून दुःखाचा हंबरडा फोडला. प्रसंगी दिग्दर्शक सदानंद बोरकर यांचा यावेळी मित्रांगण कडून मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. यात साकोली कार्यकारीणीचे डॉ. नरेश कापगते, डॉ. अरुण झिंगरे, प्रशांत गुप्ता, सदु (शरद) कापगते, दामोदर कापगते, किशोर डोये, छगन पुस्तोडे, ॲड. दिलीप कातोरे, डॉ. सुनील समरीत, रवि परशुरामकर, विजय दुबे, उमेश भुरे, ग्यानिराम गोबाडे, जे.डी. मेश्राम, कुंदन वल्के, तुलसीदास पटले, डी.डी. वलथरे, विनोद भेंडारकर, राम चाचेरे, राधेश्याम मुंगमाडे, बंडू शेंडे, हेमंत भारद्वाज, सुरेश बघेल, पत्रकार रवि भोंगाने, आशिष चेडगे हे हजर होते. या नाटकाचा साकोली परीसरातील अकराशेंच्यावर महिला पुरुष नाट्यरसिकांनी विलक्षण अनुभव घेतला हे उल्लेखनीय.

Previous articleविखुरलेल्या पाखरांप्रमाणे तब्बल ३६ वर्षांनी भेटले तुमसर शाळेतील मित्र-मैत्रिणी..
Next articleचिखलपहेला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here