Home बीड परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ भीषण अपघात; दोन मजुरांचा जागीच मृत्यू

परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ भीषण अपघात; दोन मजुरांचा जागीच मृत्यू

60
0

आशाताई बच्छाव

1000293497.jpg

परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळ भीषण अपघात; दोन मजुरांचा जागीच मृत्यू

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि १७  परळी तालुक्यातील धर्मापुरी गावाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. धर्मापुरीहुन भोजनकवाडीकडे विजेचे पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मयत दोन्ही मजूर भोजनकवाडी येथील रहिवासी असून ही दुर्घटना मंगळवारी दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी रात्री ०८:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भोजनकवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दिनांक १६ एप्रिल रात्री ०८:३० वाजताच्या सुमारास धर्मापुरी येथुन विजेचे पोल घेऊन ट्रॅक्टर भोजनकवाडीकडे निघाले असता, धर्मापुरी जवळील फुलावर ट्रॅक्टर पलटी झाले. यात भोजनकवाडी येथील दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. प्रल्हाद वैजनाथ फड वय – ३४ वर्षे, भाऊसाहेब माणिक केदार वय – ३७ वर्षे अशी मयत झालेल्या मजुरांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous articleनगरपालिका व परळी बस आगार यांनी वैद्यनाथ मंदिरास भक्तांसाठी सिटी बसची व्यवस्था करावी
Next articleश्रीराम जन्म सोहळा म्हणजे रामनवमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here