Home बीड नगरपालिका व परळी बस आगार यांनी वैद्यनाथ मंदिरास भक्तांसाठी सिटी बसची व्यवस्था...

नगरपालिका व परळी बस आगार यांनी वैद्यनाथ मंदिरास भक्तांसाठी सिटी बसची व्यवस्था करावी

30
0

आशाताई बच्छाव

1000293495.jpg

नगरपालिका व परळी बस आगार यांनी वैद्यनाथ मंदिरास भक्तांसाठी सिटी बसची व्यवस्था करावी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: १६  परळी शहरात
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ओळखले जाते. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशातील, विदेशातील, परराज्यातील व आपल्या महाराष्ट्रातील भाविक भक्त दर्शनासाठी येतात. शहरातील थर्मल पावर स्टेशन (शक्तीकुंज वसाहत) ते वैद्यनाथ मंदिर पर्यंत नगरपालिका आणि परळी बस आगार प्रमुख यांनी पुढाकार घेऊन भाविक भक्तांची सोय करावी अशी मागणी शहरातील सर्व भाविक भक्तांनी केली आहे. तसेच पुणे मुंबई, शिर्डी, शेगावच्या धर्तीवर आणि अनेक देवस्थानांमध्ये सिटी बसची व्यवस्था असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांचे पाय पोळतात. थर्मल पावर स्टेशन ते रेल्वे स्टेशन, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक मार्गे मंदिर परिसर पर्यंत सिटी बसची सोय केल्यास त्याचा फायदा हा परळीकरांना होईलच त्याचबरोबर बाहेर गावाहून आलेले भाविक भक्तांना पण याचा लाभ घेता येईल. त्यामुळे गरज लक्षात घेऊन नगरपालिका आणि परळी बस स्थानक आगार प्रमुख यांनी पुढाकार घेऊन सिटी बसची व्यवस्था करावी अशी मागणी भाविक भक्तांकडून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here