Home नाशिक मनू मानसी संस्थेच्या विविध स्पर्धा संपन्न

मनू मानसी संस्थेच्या विविध स्पर्धा संपन्न

225
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-201334_WhatsApp.jpg

नाशिक,(प्रतिनिधी अँड विनया नागरे)- मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
मनू मानसी संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम होत असतात. मनू मानसी संस्थेने श्रावण महिना निमित्त मंगळागौर स्पर्धा, सोलो डान्स स्पर्धा, श्रावण क्वीन स्पर्धा आणि रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या सर्व स्पर्धा पवार ग्रीन स्पेसेस येथे घेण्यात आल्या. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड सौ.विनया अमित नागरे (बन्सोड,) यांनी केले.तसेच स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मा.श्री नंदकिशोर शेवाळे सर, कास्टिग डायरेक्टर ,मा.सौ. कविता पाटील,मा. रचना चिंतनवार यांनी उत्तम निर्णय देऊन स्पर्धेचे विजेते काढले.
या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य मयूर अलंकार प्रा. ली. गंगापूर रोड, साई संस्कृती पैठणी, रायगड चौक,पवन नगर ,एस. पी. रेंटल ब्युटीक आणि तनु ब्युटी पार्लर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विशेष सहकार्य सौ. मेघा राजेश शिंपी. मनू मानसी संस्थेच्या संस्थापिका, सौ. कविता पाटील, अँड सौ. विनया नागरे ,( स्वराज्य संघटनाच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष)आणि श्रीमती धनश्री गायधनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि जिजाउंच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मा. श्री.नंदकिशोर शेवाळे कास्टिग डायरेक्टर,मा. पुष्पा अग्रवाल, मा. तनु ब्युटी पार्लर आणि मनू मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा शिंपी , अँड विनया नागरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात श्रावण क्वीन
प्रथम विजेता माधवी भोसले द्वितीय विजेता.संगिता इंगळेRamp वॉक प्रथम विजेता.वैशाली डांगे द्वितीय विजेता. सौ.विद्या शहाणेसोलो डान्स.15ते 30 ageबेस्ट सोलो डान्स. अनुष्का पाटील प्रथम विजेता.वैशाली पाटील द्वितीय विजेता.आद्या माने30ते 65 age सोलो डान्स प्रथम, विजेता. माधवी भोसले, द्वितीय विजेता ..सुरेखा मैड, तृतीय विजेता.शर्मिला निकम, मंगळागौर स्पर्धांचे प्रथम विजेते रॉकिंग लेडीज ग्रूप, द्वितीय विजेता. इंद्रधनुष्य ग्रूप आणि तृतीय विजेता. लावण्या ग्रूप या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, ऑनलाईन सर्टिफिकेट, पैठणी गिफ्ट आणि रोख बक्षीस देण्यात आले. सर्व मंगळागौर ग्रूपच्या मेंबरला नथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला अनेक संस्थांपिका उपस्थित होत्या श्रीमती सुरेखा घोलप,डॉ. अर्चना गणोरकर, सौ एकता कदम, सौ मयुरी शुक्ला,सौ. वैशाली सपकाळे, सौ. प्राजक्ता देशपांडे, सौ. गीता समसुका, स्टार न्यूज चे श्री विलास सुर्यवंशी सर आणि कुलकर्णी सर याच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली
मनू मानसी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली . कार्यक्रमांचे आयोजन सौ.मेघा शिंपी, अँड.विनया नागरे, कविता पाटील, धनश्री गायधनी, वर्षा चौधरी सौ.पल्लवी कुंवर,राजनंदिनी आहिरे, स्नेहा शिंपी, सुनिता गांगुर्डे, मिरा आवारे, हेमलता वानखेडे, मनिषा मते, मनिषा विसपुते, शैला ठाकर, संगिता इंगळे , सुरेखा मैंड, शर्मिला निकम, पूनम सरोदे, रचना चिंतनवार, भाग्यश्री अमृतकर सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. सौ.मेघा शिंपी यांनी आभार मानले.

Previous articleसरकारी शाळांच्या खाजगीकरण व पदभरतीतील भ्रष्टाचार विरोधात मुव्हमेंट फॉर जस्टीस चा एल्गार
Next articleसांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणाउत्सवानिमित विशेष बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here