Home पुणे सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणाउत्सवानिमित विशेष बैठक संपन्न

सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणाउत्सवानिमित विशेष बैठक संपन्न

110

आशाताई बच्छाव

IMG-20230914-WA0094.jpg

सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणाउत्सवानिमित विशेष बैठक संपन्न
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
दिनांक 13/09/2023 रोजी 18/00 वा ते 19/00 वाजण्याच्या दरम्यान सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष/पदाधिकारी, शांतता समिती. मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र तसेच प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी यांची बैठक रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे घेण्यात आली.
त्या प्रसंगी पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मा. श्री . विशाल बिभीषण क्षीरसागर यांच्या हस्ते सांगवी पोलीस स्टेशनचे पी आय पोळसाहेब यांना संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.
➡️ सदर बैठकीत मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होऊ नये, याअनुषंगाने योग्य त्या मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.
➡️ रहदारीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरिता जास्तीत जास्त ओळखपत्रसह स्वयंसेवक नेमावे
➡️ मंडळातर्फे आक्षेपाह देखावे लावू नये, जबरदस्तीने वर्गणी आक्षेपार्य घोषणाबाजी गाणे वाजवू नये याबाबत सूचना देण्यात आल्या
➡️ विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम, डिजे/ डॉल्बीचा वापर करणार नाहीत.
➡️ सर्व परवाने घेऊनच उत्सव साजरा करावा.
➡️ तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे
➡️ सदर मिटींगला शांतता समिती सदस्य, महीला दक्षता कमिटी, मोहल्ला कमिटी पोलीस मित्र तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष/ पदाधिकारी व 100 ते 150 कार्यकर्ते हजर होते.
बैठक चे आभार प्रदर्शन विशाल जाधव यांनी केले.

Previous articleमनू मानसी संस्थेच्या विविध स्पर्धा संपन्न
Next articleसंत रविदास चर्मउद्योग आर्थिक विकास महामंडळाच्या अटी रद्द कराव्या चर्मकार समाजाची जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.