Home गडचिरोली सरकारी शाळांच्या खाजगीकरण व पदभरतीतील भ्रष्टाचार विरोधात मुव्हमेंट फॉर जस्टीस चा एल्गार

सरकारी शाळांच्या खाजगीकरण व पदभरतीतील भ्रष्टाचार विरोधात मुव्हमेंट फॉर जस्टीस चा एल्गार

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20230914-WA0090.jpg

सरकारी शाळांच्या खाजगीकरण व पदभरतीतील भ्रष्टाचार विरोधात मुव्हमेंट फॉर जस्टीस चा एल्गार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :- राज्यातील सर्व सरकारी शाळा खाजगी उद्योजकांना हस्तांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला व राज्यातील पदभरती मधील भ्रष्टाचाराला गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवला असून लवकरच मोठे जण आंदोलन उभारण्यासाठी आज मुव्हमेंट फॉर जस्टीस च्या पुढाकाराने संविधान सभागृहात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

सदर बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटना, शिक्षक संघटना व राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित राहून सरकारच्या या जनविरोधी धोरणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यामध्ये व्यापक जन आंदोलन उभे करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

राज्यातील सरकारी शाळा उद्योजकांना हस्तांतरित करणे म्हणजे राज्यातील गोर गरीब शेतकरी, कामगार, बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे आणि वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हे हनन आहे. तसेच राज्यातील पदभरती मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे, अवाढव्य परीक्षा फी मुळे, व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्ह्यात न घेता बाहेर जावे लागत असल्यामुळे हा जिल्ह्यातील युवकांवर मोठा अन्याय आहे. व या बाबीचा विरोध मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे अशा भावना यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

सभेचे प्रास्ताविक राज बनसोड यांनी, तर आभार विनोद मडावी यांनी केले.
यावेळी मुव्हमेंट फॉर जस्टीस चे रोहिदास राऊत, शेकापचे रामदास जराते, सीपीआयचे डॉ. महेश कोपुलवार, देवराव चौरे , अनिसचे विलास निंभोरकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश दुधे, हंसराज उंदीरवाडे, राष्ट्रवादीचे संजय कोचे, BRSP चे प्रितेश अंबादे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, बादल मडावी, गोंडवाना पार्टीचे प्रशांत मडावी, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव मडावी, राहुल बनकर, सुधीर वालदे, परमेश्वर गावडे, लहू रामटेके, प्रतीक डांगे, सुधा चौधरी, उमेश गावळे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

_______________

Previous articleएटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला मनसेत प्रवेश
Next articleमनू मानसी संस्थेच्या विविध स्पर्धा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here