Home गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला मनसेत प्रवेश

एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला मनसेत प्रवेश

150

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-193422_WhatsApp.jpg

एटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला मनसेत प्रवेश

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) – विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावातील अनेक युवक युवती महिला पुरुषांनी जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केले आहे.
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच्या” संकल्पनेन प्रेरीत होऊन एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली नागेश मडावी,निरज मडावी,अभिजीत मट्टामी,रोशन मट्टामी,अर्पणा मडावी,चंद्रकला ईष्टाम,प्रियंका मडावी,सुशांत मडावी,श्रेयश मडावी,आकाश ईष्टाम,नितिन ईष्टाम,उत्तम ईष्टाम यांच्यासह अनेक युवक, युवती महिला व पुरुषांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश केले आहे.
यावेळी गावातील विविध समस्यांवर चर्चा करून लवकरच समस्यांचा लवकरच निराकरण करण्यात येईल त्यासाठी गावकऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक असल्याचे वाकुलकर यांनी मार्गदर्शनात म्हतले आहे. यावेळी मनसे चे शाखा अध्यक्ष अमोल रामटेके, तालुका अध्यक्ष नागेश तोरेम, राहुल गेडाम उपस्थित होते.

Previous articleपाऊसाचा जोर उद्यापासून राज्यभर वाढण्याची शक्यता
Next articleसरकारी शाळांच्या खाजगीकरण व पदभरतीतील भ्रष्टाचार विरोधात मुव्हमेंट फॉर जस्टीस चा एल्गार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.