Home Breaking News पाऊसाचा जोर उद्यापासून राज्यभर वाढण्याची शक्यता

पाऊसाचा जोर उद्यापासून राज्यभर वाढण्याची शक्यता

193

आशाताई बच्छाव

Screenshot_20230914-192309_Google.jpg

पाऊसाचा जोर उद्यापासून राज्यभर वाढण्याची शक्यता
पुणे,(उमेश पाटील ब्युरो चीफ) – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टा तयार झाला असून, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच पाऊसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज गुरुवार नंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटी सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र दिसत आहे, अंशतः ढगाळ हवामान आणि उन्हाच्या चटक्यामुळे उकाड्यातही काही अंशी वाढ झाल्याचे बघावयास मिळत आहे.बुधवारी शहरात पावसाने उघडीप घेतली होती. तर जिल्ह्यातही सर्वसाधारण अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. सरासरी कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.राज्यातील अंदाज -बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ‘ अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून,
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, टिकमघर, दाल्टोनगंज, दिघा ते पश्‍चिम – मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब पट्ट्यापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Previous articleमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleएटापल्ली तालुक्यातील अनेक युवांनी केला मनसेत प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.