Home परभणी साईनगर तांड्याची सून गोकर्णा राठोड देश सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये

साईनगर तांड्याची सून गोकर्णा राठोड देश सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये

112
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0025.jpg

साईनगर तांड्याची सून गोकर्णा राठोड देश सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये

 

शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो चीफ)

(परभणी)जिंतूर :-तालुक्यातील साईनगर तांड्यावरील सून गोकर्णा सचिन राठोड देशसेवेसाठी सीआरपीएफ मध्ये निवड झाली असून ११ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून आज मंगळवारी ती साईनगर तांड्यात दाखल झाली. यावेळी गावकऱ्यांच्या व नातेवाइकाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतषबाजी व डिजेच्या तालावर नाचत गाजत गावातून तांड्या पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. अतिशय आनंदी वातावरणामध्ये गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहताना दिसून आले.
या बाबतची अधिक माहिती अशी की गोकर्णा परमेश्वर चव्हाण रा. वडचुना ता. औंढा जि. हिंगोली येथील असून, काही वर्षांपूर्वीच तिचा विवाह जिंतूर तालुक्यातील साईनगर तांडा येथील सचिन प्रकाश राठोड यांच्याशी विवाह झाला. लग्न झाल्या नंतर सासरी आलेल्या गोकर्णाने आपल्या शिक्षणाचा हट्ट सासू-सासरे यांच्या कडे धरला आणि सासू-सासऱ्यांनी क्षणाचा ही विचार न करता गोकर्णा यांना शिक्षणाची परवानगी दिली व आढोळ येथील उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश करून दिला. सासू-सासऱ्यांची गरीब परिस्थिती आणि त्यांनी ठेवलेला विश्वास हे सार्थ करण्यासाठी पुढे बारावीची परीक्षा दिली व त्यामध्ये चांगल्या गुणांनी पास झाली. मना मध्ये देश सेवा करण्याची जिद्द असल्याने शेता मध्ये काम करत करत आपल्या अभ्यास सुरूच ठेवला.
विशेष बाब म्हणजे गोकर्णा सचिन राठोड हिला एक तीन वर्षांचे चिमुकले बाळ आहे. गोकर्णा ही आपल्या घरी आल्यावर तिने मी सर्वप्रथम सासू-सासऱ्यांना सॅल्यूट करून सासऱ्यांच्या डोक्यावर आपल्या डोक्यातील मानची वर्दी घातली. हा क्षण खूपच भावुक असल्याने उपस्थित नातेवाइ व गांवकरी यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. यावेळी गोकर्णा यांच्या स्वागतासाठी गोर सेनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच विजय आढे, प्रकाश राठोड, अमोल जाधव, हरिदास राठोड, विनोद राठोड, विकास राठोड, कोंडीराम जाधव, बबन चव्हाण, राजू राठोड, गणेश चव्हाण, सचिन राठोड, अविनाश आढे, पंढरीनाथ जाधव, भालचंद्र राठोड सह गावातील नागरिकांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटना प्रसिध्दी प्रमुखपदी तुषार शिरसाठ
Next articleदेगलूर शहरातील इंग्रजी शाळांची चौकशी करा, भागवत पाटील सोमूरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here