Home नाशिक स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रसिध्दी प्रमुखपदी तुषार शिरसाठ

स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रसिध्दी प्रमुखपदी तुषार शिरसाठ

192

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0024.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी तुषार शिरसाठ यांची निवड.
नुकतीच चांदवड येथे बाजार समितीच्या सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कांद्याचे घसरते भाव,अतिरिक्त उसाचा प्रश्न,येणाऱ्या काळात माफक दारात आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध व्हावेत ,शेतीमालाच्या हमीभावासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचा ठराव घेणे ,शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळावी याविषयांवर चर्चा करण्यात आली तसेच यावेळी सर्वानुमते तुषार शिरसाठ यांची प्रसिद्धीप्रमुखपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.तुषार शिरसाठ हे देवळा तालुक्यातील मूळ मेशी येथील रहिवासी असून यापूर्वी त्यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
यावेळी सोमनाथ बोराडे, निवृत्ती गारेपाटील, गोविंद पगार,संजय जाधव, श्रावण देवरे,परशराम शिंदे,आत्माराम पाटील, गजानन घोटे, रवींद्र शेवाळे,रामकृष्ण जाधव,प्रकाश जाधव

Previous article7 जून रोजी आमगाव (म.), येथे निशुल्क आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न
Next articleसाईनगर तांड्याची सून गोकर्णा राठोड देश सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.