Home गडचिरोली 7 जून रोजी आमगाव (म.), येथे निशुल्क आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर व...

7 जून रोजी आमगाव (म.), येथे निशुल्क आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

151

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0084.jpg

7 जून रोजी आमगाव (म.), येथे निशुल्क आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// कोरोना महामारी पासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, आवश्यक त्या वेळी गरजू व्यक्तीस रक्त पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो अशी परिस्थिती उद्भवू नये याकरिता जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक युवा कार्यकर्ते अनुप कोहळे आणि त्यांचे सहकारी यांच्या नवीन संस्थेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथे दिनांक 7 जून 2022 रोजी, सकाळी 10 वाजता, शहीद बाबुराव शेडमाके माध्य.विद्यालयात,  निशुल्क आरोग्य तपासणी (डोळे, BP, सुगर इ.) व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजीत करण्यात आलेला आहे.  आरोग्य तपासणी शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातून तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून मोठ्या संख्येने नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अधिक माहिती करिता व  इच्छुक रक्तदात्यांनी अनुप कोहळे 9923815724/ 762086976, विनोद शेंगर, किशोर पोहणकर, रवी बोदलकर, गजानन कुनघाडकर, देवीदास कोहळे, आशिष कारडे, जितेश शेट्टीवार, संदीप कोपुलवार, सूरज चलाख, ताराचंद गव्हारे, यांच्याशी संपर्क करावे व मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन अनुप कोहळे यांनी केले आहे.

Previous articleनानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांची सुकडी जि. भंडारा येथे भेट
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटना प्रसिध्दी प्रमुखपदी तुषार शिरसाठ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.