Home नांदेड महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करा

महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करा

133
0

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0052.jpg

महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करा
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधी
लोहा न.पा.च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी शिवा संघटनेच्या वतीने लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी व्यंकटेश मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली दि.(२२) जुन रोजी लोहा न.पा.त शिवा संघटना तालुका शाखा लोहाच्या वतीने लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी व्यंकटेश मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे असे नमूद केले की, वरील विषयास अनुसरून आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, नगर पालीका लोहाच्या ठरावानुसार नगर पालीकेच्या प्रांगणात लोकशाही चे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे बांधकाम आठ दिवसांच्या आत भूमीपूजन करून चालू करण्यात यावे व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम येणाऱ्या न.पा. निवडणुकीपूर्वी महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अन्यथा शिवा संघटना तालुका शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे , उपाध्यक्ष अंकुश सोनवळे, शहराध्यक्ष सुर्यकांत आणेराव, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव शेटे, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजकुमार पिल्लोळे, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, शिवा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेशवर मानसपुरे, मनोज शेलगावकर, लक्ष्मण कांजले,अजय कांजले मलकू अप्पा शेटे, नागनाथ आरळे, नागेश आरळे, गजानन आणेराव , शेखर शेटे, कपिल नवघरे, अरुण नाईकवाडे, संगमेश्वर चपटे, हरी वडे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleधांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर
Next articleसीसीटीव्ही ने केला चोरीचा भांडाफोड, ४ लाख ४१, हजार ८८६ रोकड ची सुरक्षारक्षकानेच लांब होण्याचे गुड उघड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here