Home नाशिक कुंदेवाडी ला स्वामी विवेकानंद विद्यालयात अवतरली पंढरी याची देह याची डोळा हाच...

कुंदेवाडी ला स्वामी विवेकानंद विद्यालयात अवतरली पंढरी याची देह याची डोळा हाच तो दिंडी सोहळा हा प्रसंग प्रत्यक्षात अनुभवला

225
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0028.jpg

कुंदेवाडी ला स्वामी विवेकानंद विद्यालयात अवतरली पंढरी

याची देह याची डोळा हाच तो दिंडी सोहळा हा प्रसंग प्रत्यक्षात अनुभवला

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी ता.निफाड या शाखेत आज साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले. विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त अतिशय सुंदर असा उपक्रम राबवण्यात आला विद्यालयातून दिंडीचे प्रस्थान कुंदेवाडी गावात करण्यात आले होते.याप्रसंगी बाल चिमुकले वारकऱ्यांच्या वेशभूषेत तर मुली रुक्मिणीच्या वेशभूषेत खूपच सुंदर दिसत होते. प्रथमतः विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री शांताराम गायकवाड सरांच्या हस्ते पालखीचे औक्षण झाले, त्यानंतर सर्व शिक्षक वृंदांनी देखील पालखीचे पूजन केले. विद्यालयाची विद्यार्थिनींनी कुमारी वेदिका शहा आणि दुर्वा वावधने या विद्यार्थिनींनी साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा हुबेहूब उठवली होती.पालखीचे प्रस्थान कुंदेवाडी गावाकडे झाले, माऊली – माऊली चा जयघोष करत या बाल चिमुकल्यांची दिंडी खूपच प्रसन्न ,हरिमय, अध्यात्मिक भजनाचा गजर वारकरी पंढरीला चालले आहे असे वाटत होते. दिंडी गावात गेल्यानंतर गावातील बायकांनी दिंडीचे औक्षण केले अगदीच भक्तिमय आणि भारावून टाकणारे वातावरण निर्मिती झाली होती.गावचे ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर रिंगण सोहळा झाला, यात बाल चिमुकल्यांसहित शिक्षक, ग्रामस्थ यांनी या दिंडीचा आनंद लुटत फुगडी चा आणि माऊलीचा जयघोष करत पांडुरंगाचे नामस्मरण केलं.*याची देह याची डोळा हाच तो दिंडी सोहळा* हा प्रसंग प्रत्यक्षात ग्रामस्थांनी अनुभवला. याप्रसंगी कुंदेवाडीचे बहुसंख्य पालक, ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षक साहेबराव मुळक या सरांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री राजेश खताळ क्रीडा प्रमुख श्री विलास निरभवणे ,संगीता रणशूर, पवार रंजना, हेमंत जाधव ,भारती बोडके , सुवर्णा खालकर ,मनीषा भोर, स्वप्नाली जाधव ,श्वेता पानगव्हाणे, पुष्पांजली कापडणीस, प्रियंका काळे, तनुजा जाधव तसेच सोपान गीते, राजू जाधव ,अशोक निकम, अशोक कुशारे, रवी ढोमसे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here