Home नांदेड श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0113.jpg

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 23 :-जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढला आहेत.

जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 9 सप्टेंबर रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील,

डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.

Previous articleपर्यटन स्थळ अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट
Next articleऔरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जणांचे वाचले प्राण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here